धरणातील एकुण पाणी साठा २१. ५६ टीएमसी

पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चारही धरणातील एकुण पाणीसाठ २१.५६ टीएमसी  इतका झाला आहे. गेल्या चाेवीस तासांत या पाणीसाठ्यात दिड  टिएमसीने वाढ झाली आहे.

गेल्या दाेन िदवसांपासून खडकवासला, पानशेत, वरसगांव अािण टेमघर या धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली अाहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली अाहे. पुणेकरांच्या वर्षभराच्या पाण्याची िचंचा मिटली असुन, अाता शेतीकरीता अावश्यक पाण्याची िचंताही मिटण्याची स्थिती निर्माण झाली अाहे. खडकवासला धरण शंभर टक्के भरल्याने यातुन गुरुवारी नदीत पाणी साेडण्यात अाले हाेते. त्यानंतर पावसाचा जाेर कमी झाल्याने पाणी साेडण्याचे प्रमाण कमी केले गेले. याचारही धरण क्षेत्रात गुरुवारी रात्री ते शुक्रवारी सकाळी सहापर्यंत पावसाची दमदार हजेरी लागली यामुळे पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली.

शुक्रवारी सकाळी सहा ते सांयकाळी पाचपर्यंत खडकवासला धरण क्षेत्रात ४ मिलीमीटर पावसाची नाेंद  झाली. तर पानशेत धरण क्षेत्रात १६ मिलीमीटर पावसाची नाेंद झाली असुन,  या धरणातील पाणीसाठा ८.७८ िटएमसी इतका झाला असुन, त्याची टक्केवारी ८२.४२ टक्के झाली अाहे. वरसगांव धरण क्षेत्रात १४ मिलीमीटर पावसाची नाेंद झाली असुन, या धरणातील पाणीसाठा ८.७९ टक्के झाला असुन, त्याची टक्केवारी ६८.५८ टक्के इतकी अाहे. तर टेमघर धरणक्षेत्रात ४३ मिलीमीटर पावसाची नाेंद झाली असुन, त्यामध्ये २ िटएमसी इतका पाणी साठा झाला अाहे. त्याची टक्केवारी ५४ टक्के इतकी अाहे.  याचारही धरणातील एकुण पाणी साठवण क्षमता २९.१५ टिएमसी इतकी असुन, शुक्रवारी संायकाळपर्यंत एकुण साठा २१.५५ टक्के इतका झाला अाहे.

पुणे शहरात सलग दुसऱ्या िदवशी संततधार पावसाने हजेरी लावली. सकाळी पावसाने उघडीप िदली हाेती, दुपारी बारानंतर पावसाच्या हलक्या सरी बरसु लागल्या. यामुळे रस्त्यावर िठकठिकाणी पाणी साठले हाेते. तसेच काही िठकाणी सलग पडणाऱ्या पावसामुळे रस्ते खराब हाेऊन तेथे खड्डे पडू लागले अाहे. रस्त्यावरील खड्ड्यांची संख्या वाढु लागली अाहे.