प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यांची बदली

बन्सी गवळी यांची बढती सरकारकडे प्रलंबित होती. त्यानुसार, गवळी यांची बदली झाली असून अमरावती-अकोला जिल्हा जात पडताळणी समिती अध्यक्ष पदावर त्यांना बढती देण्यात आली आहे.

पिंपरी: पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे (पीसीएनटीडीए) मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना अमरावती-अकोला जिल्हा जात पडताळणी समिती अध्यक्ष पदावर बढती मिळाली आहे. सहा महिन्यांतच त्यांची बदली झाली आहे. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून १ जुलै रोजी गवळी यांची नियुक्ती झाली होती.

बन्सी गवळी यांची बढती सरकारकडे प्रलंबित होती. त्यानुसार, गवळी यांची बदली झाली असून अमरावती-अकोला जिल्हा जात पडताळणी समिती अध्यक्ष पदावर त्यांना बढती देण्यात आली आहे. मात्र, पिंपरी चिंचवड़ नवनगर विकास प्राधिकरणाच्या नवीन सीईओ पदी अद्याप कुणाची नियुक्ति न झाल्याने गवळी यांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. नवीन नियुक्ति झाल्यानंतर ते आपला नवीन पदभार स्वीकारतील.