तृतीयपंथीयाचा डोक ठेचून खून, पुण्यात प्रचंड खळबळ

सागर उर्फ सारिका याचा दरी पुलाजवळील टेकडीवर जाण्याच्या रस्त्यावर झाडात मृतदेह टाकण्यात आला होता. आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार, भारती विद्यापीठ व गुन्हे शाखेच्या पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

    पुणे :  पुण्यातील दरी पुलाच्या जंगलात एका २३ वर्षीय तृतीयपंथीयाचा डोक ठेचून खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याघटनेने प्रचंड खळबळ उडाली असून, घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकांनी धाव घेतली आहे.सागर उर्फ सारिका उसगरे (वय २३) असे खून झालेल्या तृतीयपंथीयांचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर उर्फ सारिका याचा दरी पुलाजवळील टेकडीवर जाण्याच्या रस्त्यावर झाडात मृतदेह टाकण्यात आला होता. आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार, भारती विद्यापीठ व गुन्हे शाखेच्या पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आल्याचे दिसून आले. तपासणी करत असताना तो तृतीयपंथी असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलीसांकडून तपासाला सुरूवात करण्यात आले आहे. अद्याप खूनाचे कारण व आरोपी अज्ञात असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.