पंडित बिरजू महाराज यांना राजकीय क्षेत्रातूनही श्रद्धांजली; काय म्हणाले नेते ?

‘‘मी महाराष्ट्राला माझा पिता आणि बंगालला माता मानतो. कारण माझ्या कलेची सुरूवात बंगालमध्ये झाली; पण मला अनेक मानसन्मान व नावलौकिक महाराष्ट्राने दिले.” असं पंडित बिरजू महाराज यांनी म्हटलं होतं.

    पुणे: देशातील प्रसिद्ध कथ्थक नर्तक आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, ते ८३ वर्षांचे होते. काल मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. महाराजांच्या निधनाची माहिती त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

    Koo App

    भारतीय कला-संस्कृति को कथक नृत्य शैली के माध्यम से संपूर्ण विश्व में प्रसिद्धि दिलाने वाले कथक सम्राट पद्म विभूषण पंडित बिरजू महाराज जी का निधन अत्यंत दुःखद है। उनको मेरी भावभीनी श्रद्धांजलि। पंडित बिरजू महाराज जी का निधन कला जगत एवं देश के लिए अपूरणीय क्षति है। ईश्वर दिवंगत आत्मा को शांति प्रदान करे और परिजनों को संबल दे। ॐ शांति

    Nitin Gadkari (@nitin.gadkari) 17 Jan 2022

    लखनऊ घराण्यातील बिरजू महाराज यांचे खरे नाव ब्रिजमोहन मिश्रा होते. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ रोजी लखनऊ येथे झाला होता. दिल्लीतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि ते बेशुद्ध झाले. त्यांना दिल्लीतील साकेत रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

    Koo App

    प्रख्यात कथ्थक नर्तक पद्मविभूषण पं. बिरजू महाराज यांचे निधन झाले.ही बातमी अतिशय दुःखद आहे. महाराष्ट्राला पिता आणि बंगालला माता मानणाऱ्या पंडितजींनी आयुष्यभर कलेची साधना केली. लखनवी घराण्याचे कथ्थक जगभर पोहोचविले.त्यांच्या निधनामुळे भारतीय कला विश्वातील एक चमकता तारा निखळला.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

    Supriya Sule (@supriya_sule) 17 Jan 2022


    ‘‘मी महाराष्ट्राला माझा पिता आणि बंगालला माता मानतो. कारण माझ्या कलेची सुरूवात बंगालमध्ये झाली; पण मला अनेक मानसन्मान व नावलौकिक महाराष्ट्राने दिले.” असं पंडित बिरजू महाराज यांनी म्हटलं होतं.

    Koo App

    जगप्रसिद्ध नर्तक पंडित बिरजू महाराज जी यांच्या निधनामुळे एका युगाचा अंत झाला आहे. कथक नृत्यशैलीला जागतिक पातळीवर घेऊन जाणाऱ्या बिरजू महाराजांच्या जाण्याने भारतीय शास्त्रीय नृत्य सृष्टीची मोठी हानी झाली आहे. या क्षेत्रातील त्यांचे योगदान अजरामर राहील. भावपूर्ण श्रद्धांजली! ॐ शांती ?

    Chandrakant Patil (@ChDadaPatil) 17 Jan 2022