Breaking : इंदूर-दौंड एक्सप्रेसचे दोन डब्बे लोणावळा रेल्वे स्थानकावर घसरले; वाहतूक विस्कळीत

इंदोर-दौंड एक्सप्रेस ((Indore-Daund Express) आज सकाळी आठ वाजता लोणावळा रेल्वे स्थानकात प्रवेश करत असताना गाडीचे दोन डब्बे रेल्वे रुळावरून खाली घसरले. त्यामुळे मुंबई-पुणे दरम्यानची सर्व वाहतूक विस्कळीत झाली आहे (All traffic was disrupted). सध्या डब्बे रुळावर आणण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.

    पुणे : मुंबई-पुणे (Mumbai-Pune) रेल्वे मार्गावर इंदोर-दौंड एक्सप्रेसचे (Indore-Daund Express) दोन डब्बे लोणावळा रेल्वे स्थानकावर घसरल्याची (Derailed at Lonavla railway station) घटना घडली आहे. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

    इंदोर-दौंड एक्सप्रेस आज सकाळी आठ वाजता लोणावळा रेल्वे स्थानकात प्रवेश करत असताना गाडीचे दोन डब्बे रेल्वे रुळावरून खाली घसरले. त्यामुळे मुंबईहून-पुण्याकडे जाणारी सर्व वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्या डब्बे रुळावर आणण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. त्यानंतर सर्व वाहतूक सुरळीत होईल. मागच्या इंजिनचा वेग वाढल्यामुळे अपघात झाल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप अधिकृत माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही . रेल्वे प्रशासनासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.