भाईगिरीवरून झालेल्या वादातून दोन गटात हाणामारी ; मध्यस्थी करण्यास गेलेल्या कुटूंबाला देखील मारहाण , एकाला अटक

इरफानच्या तक्रारीत म्हंटले की, पायी चालत जात असताना धक्का लागला. याबाबत विचारले असता "तू यहा का भाई है क्या, तुझे जादा मस्ती आयी है, असे म्हणत कोयता हवेत भिरवून डोक्यात मारला. परंतु तो कानाला लागल्याने थोडक्यात बचावला. यावेळी इरफान याच्या बहिणीला धक्का देऊन मारून टाकण्याची धमकी दिली आहे. अधिक तपास खडकी पोलीस करत आहेत.

    पुणे :  भाईगिरीवरून झालेल्या वादातून पाटील इस्टेटमध्ये तुंबळ हाणामारी झाली झाली. यावेळी भांडणात मध्यस्थी करण्यास आलेल्या कुटूंबाला देखील मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत.  याप्रकरणी आजर जावेद शेख (वय २२) यांच्या तक्रारीनुसार इरफान दस्तगीर शेख (वय २२) याला अटक केली आहे.

    आजरच्या तक्रारीनुसार, इरफान याने आजर हा भाईगिरी करतो. सतत परिसरात मूल घेऊन फिरतो, यावरून वाद घालत भांडण सुरू केले. यावेळी आजर यांचे आईवडील भांडण सोडवण्यास आले असता आरोपींने लोखंडी रॉड त्यांच्या डोक्यात घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच “आज तुमचे खानदान संपवून टाकतो, अशी धमकी देत यापुढे तुम्ही वस्तीत कसे राहता हेच पाहतो म्हणत गोंधळ घातला.

    तर इरफान याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आजर शेख याला अटक केली आहे. इरफानच्या तक्रारीत म्हंटले की, पायी चालत जात असताना धक्का लागला. याबाबत विचारले असता “तू यहा का भाई है क्या, तुझे जादा मस्ती आयी है, असे म्हणत कोयता हवेत भिरवून डोक्यात मारला. परंतु तो कानाला लागल्याने थोडक्यात बचावला. यावेळी इरफान याच्या बहिणीला धक्का देऊन मारून टाकण्याची धमकी दिली आहे. अधिक तपास खडकी पोलीस करत आहेत.