दुर्दैवी घटना! दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू ; तळवडे येथील घटना

ळवडे गावाजवळच मुकाई पाझर तलाव आहे. पावसामुळे तलावात ब-यापैकी पाणी साठले आहे. मयत सिध्देश आणि सतीश हे आपल्या वडीलांसह नवलाख उंबरे (ता. मावळ) येथे कामानिमित्ताने राहावयास आहे. आज आजी सिताबाई रघुनाथ हगवणे यांच्या दशक्रीयेनिमित्ताने हे कुंटुब तळवडे येथे आले होते.

    राजगुरूनगर : आपल्या आजीच्या दशक्रीयेनिमित्ताने गावी आलेल्या दोन सख्ख्या भावांचा  पाझर तलाव पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना गुरुवारी (दि. २४) वटपोर्णिमेला घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.ही घटना तळवडे (ता. खेड) येथे दुपारी दोनच्या सुमारास घडली.

    या घटनेतील सतीश दत्तात्रय हगवणे (वय १८) हा इयत्ता बारावीत होता तर सिध्देश दत्तात्रय हगवणे (वय १६) हा इयत्ता दहावीत होता. या दोन सख्या भावांना पाझर तलावात पोहण्याचा मोह आवारला नाही. दुदैवाने दोघांचा पाण्यात बुडुन म्रुत्यू झाला. या दोन मुलांच्या आईवडीलांनी आपली  ऐन तारुण्यातली मुले गमावल्याच्या घटनेने संपूर्ण कुंटुब शोकाकुल होते .

    सध्या सर्वत्र शेतीची कामे सुरु असून गावात कोणीच नसल्यामुळे एका महिलेने आरडाओरडा करुनही वेळेत मदत न मिळाल्याने या दोन युवकांचा जलसमाधी मिळाल्याचे समजते.तळवडे गावाजवळच मुकाई पाझर तलाव आहे. पावसामुळे तलावात ब-यापैकी पाणी साठले आहे. मयत सिध्देश आणि सतीश हे आपल्या वडीलांसह नवलाख उंबरे (ता. मावळ) येथे कामानिमित्ताने राहावयास आहे. आज आजी सिताबाई रघुनाथ हगवणे यांच्या दशक्रीयेनिमित्ताने हे कुंटुब तळवडे येथे आले होते. दशक्रीयाविधी कार्यक्रम उरकल्यानंतर  दुपारी एक सुमारास सतीश आणि सिध्देश पाझर तलावात पोहण्यासाठी गेले होते. मात्र पाण्याचा आणि गाळाचा अंदाज न आल्याने म्रुत्यु झाल्याची घटना समोर आली. उपस्थित गावक-यांनी आणि कुंटुबियांनी तातडीने बेशुध्द अवस्थैत असणा-या दोन भावांना पाईट येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र तोपर्यत उशीर झाला होता. पुढे शवविच्छेदनासाठी चाकण येथे हलविण्यात आले.