दुर्दैवी घटना! दुसऱ्या मजल्यारून डोक्यात विट पडून कामगार पत्नीचा जागीच मृत्यू

नारायण पवार याने संतोषनगर येथील स्वामी समर्थ मठाजवळ समर्थ अपार्टमेंट या इमारतीचे काम सुरू आहे. या इमारतीच्या वीट व प्लास्टर बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट नारायण याने घेतले होते. बांधकाम साईटवर पत्नी अंजुबाईसह या देखील इतर कामगार महिलांसोबत वीट वाहतूक करण्याचे काम करत होत्या.

    पुणे : ठेकेदार असलेल्या पतीच्या बांधकाम साइटवर काम करत असताना दुसऱ्या मजल्यारून डोक्यात विट पडून कामगार पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कात्रजच्या संतोषनगर येथे मंगळवारी दुपारी ही घटना घडली आहे.

    अंजुबाई नारायण पवार (रा. सच्चाइ माता मंदिर, कात्रज) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती ठेकेदार नारायण शिवा पवार याच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी अनिल भोसले यांनी तक्रार दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण पवार याने संतोषनगर येथील स्वामी समर्थ मठाजवळ समर्थ अपार्टमेंट या इमारतीचे काम सुरू आहे. या इमारतीच्या वीट व प्लास्टर बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट नारायण याने घेतले होते. बांधकाम साईटवर पत्नी अंजुबाईसह या देखील इतर कामगार महिलांसोबत वीट वाहतूक करण्याचे काम करत होत्या. मंगळवारी पती-पत्नी दोघेही याठिकाणी काम करत होते. अंजूबाई या खालून विटा भरून वर पाठवत होत्या. यावेळी दुसऱ्या मजल्यावरून खाली पडलेली एक वीट अंजूबाई यांच्या डोक्यात पडली. यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.