आंबेगाव तालुक्यातील टाव्हरेवाडी येथे २१० जणांचे लसीकरण

    मंचर : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील टाव्हरेवाडी येथे २१० नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घेतला, अशी माहिती आंबेगाव तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष आणि सरपंच उत्तम टाव्हरे यांनी दिली.

    टाव्हरेवाडी येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब टाव्हरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष उत्तम टाव्हरे,उपसरपंच भरत टाव्हरे, ग्रामपंचायत सदस्य महेश टाव्हरे, सानिका टाव्हरे,निर्मला टाव्हरे ,अनिल चव्हाण,पतसंस्थेचे अध्यक्ष गणेश बांगर, ग्रामसेवक सुरेखा रोकडे उपस्थित होते.

    कोरोना प्रतिबंधक लसीकरण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश ढेकळे, डॉ. विक्रम काळे,वैद्यकीय अधिकारी डॉ.रेश्मा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक परदेशी, सी. एच.ओ. शुभम रोडे,आरोग्य सेविका ज्योती गायकवाड,आरोग्य सेवक सुरशे,आशा वर्कर अश्विनी एलभर,अर्चना गावडे, कोमल विधाटे,राजेंद्र हिंगे, शिक्षक महेश शिंदे यांनी लसीकरणाची व्यवस्था पाहिली.

    सरपंच उत्तम टाव्हरे म्हणाले, टाव्हरेवाडीत प्रथमच लसीकरण मोहीम राबविण्यात आली.यापुर्वी सुमारे एक ते दिड किलोमीटर अवसरी बुद्रुक येथे जाऊन नागरिकांना लसीकरण करुन घ्यावे लागत होते. परंतु गावातच लसीकरण करण्यात आल्याने ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग व्यक्तींनी समाधान व्यक्त केले. प्रशासनाने पुढील काळात टाव्हरेवाडी येथे आठवड्यातून एकदा लसीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी आंबेगाव तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष उत्तम टाव्हरे यांनी केली आहे.