no water supply in mumbai some areas as on 2nd and 3rd December says mcgm

भामा आसखेड पाणी पुरवठा प्रकल्पातील जलवाहिनी आळंदीजवळील केळगांव येथे नादुरूस्त झाली आहे. त्यामुळे उद्या (मंगळवार) शहराच्या पूर्व भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

    पुणे : भामा आसखेड (Bhama Askhed Water Project ) पाणी पुरवठा (Water Supply) प्रकल्पातील जलवाहिनी आळंदीजवळील केळगांव येथे नादुरूस्त झाली आहे. त्यामुळे उद्या (मंगळवार) शहराच्या पूर्व भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. काम झाल्यानंतर बुधवारी सकाळी उशीरा व कमी दाबाणे पाणीपुरवठा होणार आहे, त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

    शहराच्या पूर्व भागातील लोहगाव, विमान नगर, वडगांव शेरी, कल्याणी नगर, विश्रांतवाडी, फुलेनगर येरवडा, धानोरी या परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने भामा आसखेड पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली आहे. ही योजना जानेवारीमध्ये कार्यान्वित झाली असून, या योजनेमुळे पूर्व भागातील पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांनंतर मार्गी लागला आहे. मात्र, भामा आसखेड धरणाकडून येणारी साेळाशे एमएम व्यासाच्या जलवाहिनी केळगांव हद्दीत नादुरुस्त झाली आहे. या जलवाहिनीच्या शेजारी आळंदीच्या जलवाहिनीचे काम सुरू आहे.

    या कामामुळे भामा आसखेडहून येणार्‍या जलवाहिनीला नुुकसान पोहचले असून या ठिकाणी होणारी गळती वाढली आहे. त्यामुळे त्यांच्या दुरूस्तीचे काम करण्यासाठी आज शहराच्या पूर्वभागाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर बुधवारी (दि.22) सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे.

    पाणीपुरवठा बंद राहणारा परिसर

    लोहगाव, विमान नगर, वडगांव शेरी, कल्याणी नगर, विश्रांतवाडी, फुलेनगर येरवडा, धानोरी