सचिन वाझे विरोधात लावण्यात आलेले युएपीए UAPA कलम नेमके काय आहे? जाणून घ्या हे मुद्दे

अटकेत असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझेंविरोधात एनआयएनं(NIA) ने UAPA कलमांअंतर्गत आरोप लावले. दहशतवाद्यांविरोधात लावण्यात येणारी कलम सचिन वाझे विरोधात लावण्यात आली आहे.

  मुंबई: मनसुख हिरेन प्रकरणी अटकेत असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझेंविरोधात एनआयएनं(NIA) ने UAPA कलमांअंतर्गत आरोप लावले. दहशतवाद्यांविरोधात लावण्यात येणारी कलम सचिन वाझे विरोधात लावण्यात आली आहे.

  काय आहे UAPA ?

  या UAPA (Unlawful Activities (Prevention) Act, 1967)कालमानुसार जर एखादी व्यक्ती दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहन देत असेल, त्यामध्ये सहभागी असेल, तर त्याला दहशतवादी ठरवले जाईल.

  या कलमानुसार, घातपाताचा कट रचणाऱ्या संघटनांसहीत संबंधित व्यक्तीलाही दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा अधिकार आहे. त्या व्यक्तीची संपत्ती जप्त करणे आणि प्रवासावरही बंदी आणण्याची कारवाई केली जाते.

  दहशतवादी कृत्य करणारे, दहशतवादी कारवाईची तयारी करणारे, दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणारे, दहशतवादी कारवाईत सहभाग असणाऱ्यांच्या विरोधात या कलमांतर्गत कारवाई केली जाते.

  बेकायदा कृत्य प्रतिबंधक (दुरुस्ती) विधेयक (Unlawful Activities (Prevention) Act, 1967 २०१९ रोजी राज्यसभेत मंजूर झाले.