शहा काय बाेलणार ? भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटणार ; आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर

पुढील वर्षी महापािलकेची निवडणुक हाेऊ घातली आहे. महापािलकेत सत्ताधारी असलेल्या भाजपने पुन्हा सत्ता मिळविण्याची तयारी सुरु केली आहे. नुकतेच माजी मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पक्षाच्या नवीन कार्यालयाचे उदघाटन झाले आहे.

    पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत हाेणाऱ्या भाजपच्या मेळाव्यात महापािलका प्रचाराचा नारळ फुटणार आहे. पक्ष संघटनेतील दमदार व्यक्तीमत्व असलेले शहा हे मेळाव्यात ते काय बाेलणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    गृहमंत्री पदानंतर केंद्रीय सहकारमंत्री पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर शहा हे पुण्यात प्रथमच येत आहेत. या दाैऱ्यात शहा यांचे भरगच्च कार्यक्रम हाेणार आहे. सीएफएसएल आणि एनडीआरएफ च्यावतीने आयाेजित विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहे. त्यानंतर वैकुंठनाथ मेहता नॅशनल इन्स्टीट्युट ऑफ काेअाॅपरेटीव मॅनेजमेंट या संस्थेला ते भेट देणार आहे. त्यानंतर महापािलकेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे भुमीपुजन त्यांच्या हस्ते हाेणार आहे. तसेच यानंतर गणेश कला क्रीडा केंद्र येथे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयाेजन केले गेले आहे. त्याचप्रमाणे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर येथे ते गणेश दर्शनासाठी जाणार आहेत. वैकुंठनाथ मेहता संस्थेत ते सहकार खात्याच्या कामाविषयी काय बाेलणार ? राज्यातील सहकार क्षेत्रासंदर्भात त्यांची पुढील दिशा काय असेल याविषयी ते काय बाेलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगर येथे त्यांनी केंद्रीय सहकार मंत्रालयाची गरज काय असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना मी उत्तर देण्यासाठी आल्याचे नमूद केले आहे. पुणे जिल्हा, पुणे शहर हा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते शरद पवार यांचा बालेकिल्ला मानला जाताे. सहकार क्षेत्रातील त्यांचे याेगदानही महत्वाचे असल्याने शहा यांचा हा दाैरा महत्वाचा आहे.

    पुढील वर्षी महापािलकेची निवडणुक हाेऊ घातली आहे. महापािलकेत सत्ताधारी असलेल्या भाजपने पुन्हा सत्ता मिळविण्याची तयारी सुरु केली आहे. नुकतेच माजी मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पक्षाच्या नवीन कार्यालयाचे उदघाटन झाले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महापािलका निवडणुकीचे रणशिंग भाजपने फुंकले असले तरी प्रत्यक्षात निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ अमिश शहा यांच्या उपस्थितीत फाेडला जाईल. अमित शहा हे प्रथमच पुणे दाैऱ्यावर येत असुन, ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. कार्यकर्त्यांना त्यांच्या मार्गदर्शनाचा किती फायदा हाेणार हे आगामी काळच ठरवेल. शहा यांच्या कार्यक्रमाच्या तयारीत गेल्या काही दिवसापासून भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व्यस्त झाले आहे. शनिवारी सुरक्षिततेच्या उपायासंदर्भात पाेिलस यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणांच्या सुचनांनुसार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढील कामे मार्गी लावण्यास प्राधान्य दिले. पदाधिकारी, प्रमुख कायकर्त्यांचे पासेस तयार केले गेले आहेत. कार्यक्रमाच्यावेळी नियाेजनात असलेल्या आणि प्रमुख उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या काेराेना चाचण्या केल्या गेल्या आहेत. शहरात सर्व भागात अमित शहा यांचे स्वागत करणारे फ्लेक्सबाजी केली गेली आहे.