गावातील विविध विकास कामे करणार : सरपंच गणेश दौंडकर

  यवत : सरपंच पद हे पाच वर्षांसाठी असलेतरी बोरी ऐनंदी गावच्या विकासासाठी पुढील पंचवीस वर्षाचे नियोजन करुन विकास कामे करण्याचा निर्धार असून सर्व नियोजित कामे गावातील सर्वांच्या सहकाऱ्याने आणि बरोबर घेऊन पूर्ण करण्यात येतील, असा विश्वास बोरी ऐनंदीचे नूतन सरपंच गणेश दौंडकर यांनी व्यक्त केला आहे.

  सरपंचपद आले आणि लगेच कोरोना महामारीचा त्रास सुरू झाला. यासाठी आरोग्य सेवा आणि कोरोनाबाबत सर्वांनी काळजी घेऊन सर्व ते प्रयत्न आणि साधन सुविधा उपलब्ध करून आज कोरोना डेंजर झोन मधून गाव बाहेर पडले, याचे समाधान वाटते. कोरोना तिसरी लाट किंवा यापुढेही सतत आरोग्य बाबत सर्वांनी काळजी घेऊन सशक्त गाव, आरोग्य संपन्न गाव या दिशेने वाटचाल, पाणी पुरवठा, गावात रस्ते वा विजचे गैरसोय याकडे नागरिक एकवेळ दुर्लक्ष करतात,परंतु पाणी जीवनावश्यक घटक आहे. सध्याच्या पाणी पुरवठा योग्य आहे,परंतु पाणी साठा कमी आहे. पुढील २५ वर्षाचा विचार करून ‘जळजीवन’योजनेअंतर्गत नवीन पाणी पुरवठा योजना प्रस्ताव सादर करून पाणी स्कीम कामाचे दिशेने प्रयत्नास सुरुवात केली आहे.

  वृक्षरोपण, पर्यावरण संवर्धन, वृक्षरोपण आणि पर्यावरण समतोल यासाठी काम करणे काळाची गरज आहे. यासाठी गाव आणि परिसर सर्वत्र वृक्षरोपण करून ते जगवणे आणि संगोपन यासाठी नियोजन बद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

  चार एकर क्षेत्रात गार्डन करणार

  हल्ली गावात सार्वजनिक जागा कमी होऊ लागल्या आहेत.ज्येष्ठ नागरिक, महिला लहान मुले सर्वांसाठी चार एकर जागेवर सर्व सुविधा युक्त गार्डन करण्यात येण्याचे नियोजन केले आहे. यांचे वॉकिंगसाठी ट्रॅक, मुलांसाठी घसर गुंडी, झोके, सर्व प्रकारची खेळणी, व्यायाम साधणे ठेवण्यात येतील, सर्व प्रकारचे वृक्ष, हिरवळ आणि ओषधी वनस्पती ही लावण्यात येईल. रस्ते या पूर्वीच्या पंचायतीने रस्ते चांगले केलेत.परंतु वड्या वस्त्यांवर जाणारे बैलगाडी रस्ते हे आत्ता डांबरीकरण करण्यात येणार आहेत.

  वीजेची सुविधा वाढवणार

  गावात यवत येथून वीज पुरवठा होतो, हे अंतर लांब असल्याने वीज पुरवठ्यात अडचणी पर्यायाने खंडित वीज मिळते. नुकतेच गावच्या पाणी पुरवठा योजनेस सिंगल फेज करून घेतल्याने आत्ता पाणी पुरवठा करणे सोयीचे झाले आहे. गावच्यासाठी शेती, पाणी पुरवठा, लहान व्यवसाय याना सतत आणि वेळेवर योग्य प्रमाणात वीज मिळावी यासाठी येथे ३३ केव्ही, सबस्टेशन मंजूर केले असून लवकरकच हे काम सुरू करण्यात येणार आहे.

  सांस्कृतिक खुले सभागृह

  गावच्या बोरमल नाथ मंदिर प्रांगणात सर्वत्र सार्वजनिक कार्यक्रम होतात. येथे स्टेज नाही,ओटा आहे याठिकाणी कायम स्वरूपी उपयोगी पडणारे ४० बाय ३० चे खुले सभागृह बांधण्यासाठी प्रस्ताव दिला असून त्याचा पाठपुरावा सुरू आहे.

  वरील कामे करण्याचा नियोजन आणि निर्धार केला आहे. दौडचे आमदार राहुल कुल यांनी माझ्या सर्व कामांना निधी कमी पडू देणार नाही,अशी ग्वाही दिली आहे. तरीही हे माझे एकट्याचे काम नाही, गावातील सर्व नवे जुने कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक आणि महिलांना विचारात घेऊन हे काम करण्याचा प्रयत्न करणार आहे, यश मात्र नक्कीच येईल.

  – गणेश दौंडकर, सरपंच

  (शब्दांकन : एम.जी. शेलार)