स्वबळाच्या नाऱ्यानंतर काँग्रेस उद्धव ठाकरेंसोबत राहणार का? नाना पटोले म्हणाले की…

“काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंसोबत पूर्ण ताकदीनिशी आहे. काँग्रेसकडून कोणतीही अडचण येणार नाही याची ग्वाही सोनिया गांधींनी दिली आहे”, असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे काँग्रेस पाच वर्ष शिवसेनेसोबत सत्तेत राहणार असे देखील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज (२० जून) पुण्यात माध्यमांशी संवाद साधतांना सांगितलं.

    पुणे : आघाडीतल चित्र सध्या बिघडल असल्याचं राज्यात दिसू लागलं असून महाविकास आघाडीमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस अस वारंवार दिसतंय, काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी त्याला वर्धापन दिनाच्या निमित्ताने बोलताना स्पष्ट केवय. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी आधी गोंधळातून बाहेर या, मग स्वबळाचा निर्णय घ्या, असा खोचक सल्ला दिला. त्यानंतर राज्यातील महाविकासआघाडी सरकारमध्ये फूट पडून काँग्रेस बाहेर पडणार का? अशी चर्चा सुरू झालेली असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

    “काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंसोबत पूर्ण ताकदीनिशी आहे. काँग्रेसकडून कोणतीही अडचण येणार नाही याची ग्वाही सोनिया गांधींनी दिली आहे”, असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे काँग्रेस पाच वर्ष शिवसेनेसोबत सत्तेत राहणार असे देखील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज (२० जून) पुण्यात माध्यमांशी संवाद साधतांना सांगितलं.

    दरम्यान नाना पटोले यावेळी म्हणाले की, “काल उद्धव ठाकरे जे बोलले, ते शिवसेना प्रमुख म्हणून बोलले आहेत. मुख्यमंत्री म्हणून बोलले नाहीत. त्यांची एक ठाकरे शैली आहे, भाषा आहे. मी त्या दोघांची (भाजपा आणि शिवसेना) भाषा निवडणुकीच्या वेळी ऐकली आहे कोणत्या पातळीवर गेली होती. त्यामुळे आज आम्ही म्हणतोय की, त्यांचा नेमका इशारा कोणाकडे आहे ते कळले पाहिजे”, असं देखील नाना पटोले यांनी यावेळी स्पष्ट केलं.

    काँग्रेसशिवाय पर्याय नाही…

    आम्ही राज्यात आम्ही वेगवेगळे आंदोलन करतोय. आम्ही ‘मोदी हटाव, देश बचाव’चा नारा देऊन काम करतोय. देशाला आता काँग्रेस शिवाय पर्याय नाही. राहुल गांधी हे व्हिजन असलेलं नेतृत्व आहे, असंही त्यांनी सांगितलं