डॉक्टरांच्या संरक्षणासाठी खासगी विधेयक मांडणार ; खासादर बापट यांची ग्वाही

गेल्या दीड महिन्यात देशभरात डॉक्टरांवर खूप हल्ले झाले. महाराष्ट्रातही अशा दहा ते पंधरा घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएम) पुणे शाखेच्या वतीने शुक्रवारी आंदोलन व निषेध करण्यात आला. डॉक्टरांवरील हल्ला हा किरकोळ स्वरूपाचा गुन्हा न मानता त्याचा इंडियन पिनल कोडमध्ये समावेश करावा, प्रत्येक हॉस्पिटल हे संरक्षित झोन जाहीर करावे, हॉस्पिटलच्या सुरक्षा व्यवस्थेचे कठोर नियम तयार करावेत

    पुणे : रुग्णाच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या हल्ल्यांपासून डॉक्टरांचा बचाव व्हावा, डॉक्टरांना संपूर्ण संरक्षण मिळावे, यासाठी आपण लोकसभेत खाजगी विधेयक मांडू, अशी ग्वाही खासदार गिरीश बापट यांनी डॉक्टरांना दिली.

    गेल्या दीड महिन्यात देशभरात डॉक्टरांवर खूप हल्ले झाले. महाराष्ट्रातही अशा दहा ते पंधरा घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएम) पुणे शाखेच्या वतीने शुक्रवारी आंदोलन व निषेध करण्यात आला. डॉक्टरांवरील हल्ला हा किरकोळ स्वरूपाचा गुन्हा न मानता त्याचा इंडियन पिनल कोडमध्ये समावेश करावा, प्रत्येक हॉस्पिटल हे संरक्षित झोन जाहीर करावे, हॉस्पिटलच्या सुरक्षा व्यवस्थेचे कठोर नियम तयार करावेत, हल्लेखोरांवरील खटले द्रुतगती न्यायालयात चालवावेत, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

    असोसिएशनच्या‌ सभागृहात झालेल्या या आंदोलन आणि निषेध कार्यक्रमास आयएम पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब देशमुख, विश्वस्त डॉ. अविनाश भुतकर, कृती समितीचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील डॉ. सुनील इंगळे, डॉ. जयंत नवरंगे यांच्यासह शहरातील वैद्यकीय व्यावसायिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खा. बापट यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्विकारले.