दावडी बनविणार विकासाचे माॅडेल : सरपंच संभाजी घारे

  राजगुरूनगर : खेड तालुक्याच्या पूर्वेला मोठ्या बाजारपेठेचे गाव म्हणून नावाजलेले गाव म्हणजे दावडी. तालुक्यातील एक ऐतिहासिक वारसा असलेले गाव म्हणून दावडी गावची विशेष ओळख आहे. पूर्व भागातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेली ही ग्रामपंचायत आहे. गावासाठी शिक्षण, आरोग्य, शुद्ध पाणी, सुरक्षा, युवा वर्गासाठी अभ्यासिका, कब्बडी, कुस्ती खेळांसाठी विशेष केंद्र यासाठी विशेष प्राधान्य देऊन विकासाचे आदर्श माॅडेल बनविणार असल्याचा मनोदय सरपंच संभाजी घारे यांनी व्यक्त केला.

  तालुक्यातील पाहिलं विज अटकाव केंद्र

  दावडी गावाची लोकसंख्या दहा हजाराच्या घरात असून गाव माझं एक कुटंुब आहे, असे समजून कारभार करीत अाहे. ग्रामपंचायतीचा पदभार स्वीकारल्या नंतर उपसरपंच राहुल कदम व सर्व सदस्य यांना बरोबर घेऊन तालुक्यातील कोरोना काळातील पहिले लसीकरण गावामध्ये राबविले. गावातील सर्व नागरिकांची अँटिजन तपासणी करून घेतली. गाव बंदची अंमलबजावणी करून कोरोनाला थोपविण्याचा यशस्वी प्रयोग केला. गावामध्ये महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून गाव वाढत्या गुन्हेगारीपासून सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. गावात बंदिस्त गटार योजना राबवून गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहीलो. गावात तालुक्यातील पाहिलं विज अटकाव केंद्र उभारून गाव नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षित केले असल्याचे सरपंच संभाजी घारे यांनी नमूद केले.

  महत्वपूर्ण कामे लावणार मार्गी

  ग्रामपंचायतीच्या १५ वा वित्त आयोग व पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार निधी तसेच खासदार निधीच्या माध्यमातून महत्वपूर्ण कामे लावणार मार्गी लावण्यात येणार अाहेत. गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणे, पाणी शुद्धीकरण प्लांट बसवून संपूर्ण गावाला शुद्ध पाणीपुरवठा करणे, गावातील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटचे करणे, गावातील मंदिरे व समशनभूमी परिसराचे सुशोभीकरण करणे, गावाच्या ऐतिहासिक वेसचे  नूतनीकरण करून गावाचा वसा व वारसा जपणे,  क्रीडांगण, तालीम, कुस्तीचा आखाडा अद्ययावतपणे उभारणे, महिलांसाठी महिला अस्मिता भवन उभारणे, महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध करून देणे, संपूर्ण गावांमध्ये स्ट्रीट लाईटचे  पोल उभारून त्यावर सौर दिवे बसविणे, गावातील मुलांच्या शिक्षणासाठी स्मार्ट टीव्ही, टॅब, ई – लर्निंग शिक्षणपद्धती रुजविणे,  ग्रामदैवत महालक्ष्मीमाता मंदीराची ट्रस्ट करून मंदीराला ‘ क ‘ दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणे, अशी विविध कामे अागामी काळात करण्यात येणार असल्याचे सरपंच घारे यांनी सांिगतले.

  ‘निर्मल ग्राम, कचरा मुक्त गाव’चे ध्येय

  उपसरपंच, सर्व सहकारी सदस्य यांना विश्वासात घेऊन गावाच्या बाहेर दहा गुंठे जागा उपलब्ध करून घेऊन गावतील गोळा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून कंपोस्ट खताची निर्मिती करणार अाहे. अशाप्रकारे गावातील कचरा मुक्ती व  निर्मल ग्रामचे आपले ध्येय आहे. उद्योजक सचिन नवले, पोलीस पाटील आत्माराम डुंबरे पाटील, उपसरपंच राहुल कदम, माजी उपसरपंच हिरामण खेसे, माजी उपसरपंच भाऊसाहेब होरे, उद्योजक मारुती बोत्रे, माजी सरपंच सुरेश डुंबरे पाटील, माजी चेअरमन साहेबराव दुंडे, माजी पोलीस पाटील तुकाराम गाडगे, किसन दिघे, खंडू गावडे, अंकुश दिघे, आनंदा शिंदे, चेअरमन रामदास बोत्रे, राहुल सातपुते, संदीप गाडगे, बबूशा बोत्रे, बाळासाहेब कान्हूरकर गुरुजी, माजी पोलीस पाटील शिवाजी कान्हूरकर, राजाराम कान्हूरकर, रुपेश घारे, माजी  सरपंच संगीता होरे, संतोष लोणकर, राघुजी शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामपंचायतीचे सदस्य संतोष सातपुते, अनिल नेटके, दत्तात्रय ओंबळे, राणी डुंबरे पाटील, पुष्पा होरे, माधुरी खेसे, धनश्री कान्हूरकर, मेघना ववले, संगीता मैंद, प्रियांका गव्हाणे व ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील कामे मार्गी लावणार असल्याचे सरपंच घारे यांनी सांगितले.

  सरपंच पदाची सूत्रे हातात घेतल्या पासून प्रथम महाराष्ट्रचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणे, गावातील वाड्या- वस्ती वरील रस्त्याची कामे मार्गस्थ लावणे, क्रीडांगण, तालीम, कुस्ती केंद्राची नव्याने उभारणी करणे, जिल्हा परिषदेच्या शाळांचे सुशोभीकरण करणे, अद्ययावत आरोग्यकेंद्र उभारणे व गावात शुद्ध पाण्यासाठी नवीन प्लांटची उभारणी करण्याचा माझा मानस आहे.

  – संभाजी घारे, सरपंच, दावडी

  (शब्दांकन : प्रभाकर जाधव)