मांजरींना खायला घातले म्हणून महिलेला मारहाण

कोरेगाव पार्क परिसरातील (Koregaon Park) एका उच्चभ्रू सोसायटीत फिरस्त्या मांजरीला खायला घालत असल्यावरून वाद झाल्यानंतर एका महिलेला दोन महिलांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विनयभंगासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

    पुणे : कोरेगाव पार्क परिसरातील (Koregaon Park) एका उच्चभ्रू सोसायटीत फिरस्त्या मांजरीला खायला घालत असल्यावरून वाद झाल्यानंतर एका महिलेला दोन महिलांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विनयभंगासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ५० वर्षीय महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, दोन महिलांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व आरोपी महिला आणि पुरूष एकाच सोसायटीत राहतात. सोसायटी मोठी आहे. तेथे फिरस्त्या मांजरी येतात. दरम्यान, येथील एकजण या मांजरीला सोसायटीच्या पार्किंगमध्ये खायला घालत होता. त्यावरून तक्रारदारांनी त्यांना मांजरींना खायला घालत जाऊ नका. त्या घाण करतात, मग ते काढणार कोण, असे म्हणत असताना दोन महिला तेथे आल्या. त्यांनी तक्रारदार यांना शिवीगाळ करत अश्लील भाषेत बोलणे सुरू केले.

    तसेच त्यांना हाताने मारहाण करून त्यांचे कपडे फाडून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले, असे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास कोरेगाव पार्क पोलीस करत आहेत.