मेट्रोमोनीयल साईटवरील ओळखीतून महिलेवर बलात्कार

आरोपींनी महिला आणि तिच्या भावाला बिझनेस प्रपोजल सांगून पार्टनरशिप फर्म प्रोसिडिंगसाठी महिलेच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. हॉटेल व्यवसायासाठी महिलेला दोन बँकांमधून १५ लाख रुपयांचे कर्ज काढण्यास सांगितले. तसेच अन्य कारणांसाठी महिलेकडून सहा लाख रुपये घेतले. आरोपी श्रीकांत याने एकट्याच्या नावाने रावेत येथील हॉटेलचा करारनामा केला. २७ जानेवारी २०२१ रोजी हॉटेलचा ताबा घेऊन महिलेची ३८ लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक केली.

    • महिलेची ३९ लाखांची फसवणूक

    पिंपरी : भारत मेट्रोमोनीयल साईटवर झालेल्या ओळखीतून एकाने महिलेकडून वेगवेगळ्या कारणांसाठी ३८ लाख ८२ हजार रुपये घेतले. त्या पैशांबाबत महिलेने विचारणा केली असता त्याने दारू पिऊन महिलेच्या घरी येऊन तिच्यावर बलात्कार केला. घडल्या प्रकाराबाबत कोणाला सांगितल्यास महिलेच्या भावाला जीवे मारण्याची तसेच महिलेचे अश्लील फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार सन २०१७ ते २८ डिसेंबर २०२१ या कालावधीत रावेत येथे घडला.

    सचिन भाऊसाहेब गुंजाळ (रा. दौने गुंजाळ, ता. पारनेर, जि. नगर), श्रीकांत नरेंद्र राजे (रा. स्प्रिंग डेल शाळेजवळ, नऱ्हेगाव), अभिजित पवार (रा. वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३२ वर्षीय महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मे २०१७ मध्ये भारत मेट्रोमोनीयल या लग्नाच्या संकेतस्थळावरून फिर्यादी महिलेची आरोपी सचिन याच्यासोबत ओळख झाली. सचिन याने लग्नाचे आमिष दाखवून पेट्रोल पंपाचे लायसन्स काढण्यासाठी महिलेला बजाज फायनान्समधून ५ लाख ३० हजारांचे कर्ज काढण्यास प्रोत्साहित केले. सन २०१८ मध्ये सचिन याचा भाऊ सागर गुंजाळ याच्या आयटी रिटर्नचा प्रॉब्लेम झाला असल्याचे सांगून महिलेकडून ५ लाख ९५ हजार रुपये घेतले.

    आरोपींनी महिला आणि तिच्या भावाला बिझनेस प्रपोजल सांगून पार्टनरशिप फर्म प्रोसिडिंगसाठी महिलेच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. हॉटेल व्यवसायासाठी महिलेला दोन बँकांमधून १५ लाख रुपयांचे कर्ज काढण्यास सांगितले. तसेच अन्य कारणांसाठी महिलेकडून सहा लाख रुपये घेतले. आरोपी श्रीकांत याने एकट्याच्या नावाने रावेत येथील हॉटेलचा करारनामा केला. २७ जानेवारी २०२१ रोजी हॉटेलचा ताबा घेऊन महिलेची ३८ लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक केली. ७ फेब्रुवारी २०२१ रोजी आरोपी सचिन दारू पिऊन महिलेच्या घरी आला. महिलेने पैशांबाबत विचारणा केली असता आरोपी सचिन याने तिच्यावर अनैसर्गिक संभोग केला. घडल्या प्रकाराबाबत कोणाकडे वाच्यता केल्यास महिलेसह तिच्या भावाला मारण्याची धमकी दिली. तसेच शरीरसंबंधा वेळी काढलेले फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक शिकलगार तपास करत आहेत.