दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी महिला आयोगाने घेतली दखल

या प्रकरणात  रेड्डी, अप्पर प्रधान, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती यांना  प्रत्यक्ष अथवा आपल्या वकिलामार्फत आयोगाच्या कार्यालयाला आठ दिवसांच्या आत  लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

    मुंबई :दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येच्या घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे दखल घेतली असून या प्रकरणात  रेड्डी, अप्पर प्रधान, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती यांना  प्रत्यक्ष अथवा आपल्या वकिलामार्फत आयोगाच्या कार्यालयाला आठ दिवसांच्या आत  लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत

    तसेच याप्रकरणी प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वनबलप्रमुख), नागपूर यांना संबंधित अधिकाऱ्यांवर विभागामार्फत केलेल्या कारवाईचा प्राथमिक अहवाल आयोगास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.