
पुणे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाला चिमटे काढत अप्रत्यक्ष इशाराही दिला. चौफेर टोलेबाजी करताना राऊत यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्या दराऱ्याला न घाबरण्याचे आवाहनही शिवसैनिकांना केले. शिवाय सोबत आलात तर तुमच्यासोबत किंवा तुमच्याशिवाय, असा अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी व काँग्रेसलाही इशारा दिला.
पुणे : पुणे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाला चिमटे काढत अप्रत्यक्ष इशाराही दिला. चौफेर टोलेबाजी करताना राऊत यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्या दराऱ्याला न घाबरण्याचे आवाहनही शिवसैनिकांना केले. शिवाय सोबत आलात तर तुमच्यासोबत किंवा तुमच्याशिवाय, असा अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी व काँग्रेसलाही इशारा दिला.
स्वबळाचा इशारा
येत्या महापालिकेत आपले असे नगरसेवक निवडून यायला हवेत, ज्यात आपण सत्तेतील महत्वाचे वाटकेरी असू. जसं राज्यात आहोत. आपण इतकीच माफक अपेक्षा करतोय. राज्यात महाविकासआघाडी आहे, मग महापौर पदाची आपण ईच्छा व्यक्त केली, तर त्यात काय चुकले? असा सवालही त्यांनी केला. आता संवाद साधू, आले तर सोबत नाहीतर एकटे लढू. आपण सगळ्या उमेदवारांची तयारी करू, असेही राऊत म्हणाले.
महाविकास आघाडीला
दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेत शिवसेनाचाच महापौर झाला पाहिजे, असे कार्यकर्त्यांना आवाहन करतानाच राऊत यांनी महाविकास आघाडीलाही इशारा दिला. 55 आमदारांसह आमचा मुख्यमंत्री होतो तर 40-45 नगरसेवकांसह शिवसेनेचा महापौर झाला पाहिजे. आमच्या अपेक्षा अत्यंत माफक आहेत. महाआघाडी आहे. सगळ्यांना थोड थोड मिळाले पाहिजे त्यात आम्हालाही मिळायला पाहिजे असे ते म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांनाही टोमणा
यावेळी राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांनाही टोमणा हाणला. . ते कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील पुण्यात निवडून येतात, ठीक आहे ते घासून आले असतील. पण यावेळी आपण सुद्धा महापालिकेत घासून का होईना पण ठासून येऊ, असे सांगतानाच कोल्हापूरचे गडी कोथरुडला आले किंवा पिंपरी-चिंचवडला आले, आम्हाला काही वाईट वाटत नाही. पण आमच्या अंगावर येऊ नका, असा टोमणा राऊत यांनी हाणला.
पालकमंत्री आपले नाहीत, पण राज्यात आपली सत्ता आहे. पण आपले इथे कोणी ऐकत नाही असे म्हणतात. मुख्यमंत्री आपले आहेत, पालकमंत्री ही आपलेच आहेत. त्यांनी नाही ऐकले तर त्यांना सांगावे लागेल. की मुख्यमंत्री दिल्लीला गेलेले आहेत. कारण आम्हाला उद्या दिल्लीवर ही राज्य करायचं आहे. कोण कुठं बसतात हे पाहतायेत, तिथं आपल्याला पोहचायचे आहे. त्याचा अंदाज घेत आहेत.
- संजय राऊत, खासदार, शिवसेना