रहाटणीत ७१ हजार रूपये घेऊन कामगार पसार

योगेश रामकृष्ण कनकधर (वय - ३४, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी यांचे रहाटणी येथे स्टार चिकन डेली फ्रेश नावाने चिकन दुकान आहे. या दुकानात आरोपी कामाला आहे.

    पिंपरी :  चिकन आणि अंडी विक्रीतून आलेले ७१ हजार रूपये घेऊन चिकन दुकानातील कामगार पसार झाला आहे. हा प्रकार रहाटणी येथे उघडकीस आला.

    इक्रामुल नाझीमुद्दीन शेख (वय – ३५, रा. रहाटणी) असे पैसे घेऊन पसार झालेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी योगेश रामकृष्ण कनकधर (वय – ३४, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी यांचे रहाटणी येथे स्टार चिकन डेली फ्रेश नावाने चिकन दुकान आहे. या दुकानात आरोपी कामाला आहे. चिकन आणि अंडी विक्रीतून आलेले ७१ हजार रूपये घेऊन आरोपी पसार झाला आहे.