यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रक आणि कंटेनरचा भीषण अपघात

या अपघातामुळे एक्सप्रेस वेवरील मुंबईकडे जाणाऱ्या दोन्ही लेन बंद ठेवल्यात आल्या होत्या. जवळपास दोन तास अपघातग्रस्त वाहन एक्स्प्रेस वेवर पडून होतं. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान आता महामार्ग पोलीस देवदूत यंत्रणेच्या साहाय्यानं अपघातग्रस्त दोन्ही गाड्या बाजूला करण्यात आल्यात.

    पुणे: मुंबई पुणे एक्स्प्रेस- वेवर ताजे गावाजवळ पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रक आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आलं आहे.

    या अपघातामुळे एक्सप्रेस वेवरील मुंबईकडे जाणाऱ्या दोन्ही लेन बंद ठेवल्यात आल्या होत्या. जवळपास दोन तास अपघातग्रस्त वाहन एक्स्प्रेस वेवर पडून होतं. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान आता महामार्ग पोलीस देवदूत यंत्रणेच्या साहाय्यानं अपघातग्रस्त दोन्ही गाड्या बाजूला करण्यात आल्यात.
    भरधाव ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ट्रक पुढे जाणाऱ्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. ही धडक भीषण होती की कंटेनर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर आडवा झाला. मुंबईकडे जाणारी वाहतूक आता सुरु झाली आहे. तसंच अपघातात जखमी असलेल्या ट्रक चालकाला उपचारासाठी सोमटणे येथील पवना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.