प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

आरोपीने पीडित मुलीला ती अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही तिच्या सोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. पीडित मुलीच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

    पिंपरी: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यात अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. किरण सत्यवान चंदनशिवे (वय२१, रा. जगताप नगर, थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित अल्पवयीन मुलीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मे २०२०ते १८ मार्च २०२१ या कालावधीत रहाटणी आणि थेरगाव परिसरात घडला.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित मुलीला ती अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही तिच्या सोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्यामध्ये अल्पवयीन मुलगी तीन महिन्यांची गरोदर राहिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.