लग्नाचे आमिष दाखवून तरुणाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पीडित मुलीला मोशी येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यामुळे मुलगी गरोदर राहिली. मुलगी सहा महिन्यांची गरोदर असताना हा प्रकार उघडकीस आला.

    पिंपरी: मागील काही दिवसांपासून शहरात तरुणीवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. निगडी येथे लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना न उघडकीस आली आहे. यातून मुलगी गर्भवती राहिली असून हा प्रकार २० मार्च ते २७ ऑगस्ट या कालावधीत रुपीनगर आणि मोशी येथे घडला आहे. याप्रकरणी विठ्ठल मंकाळ पवार (वय २०, रा. ओटास्कीम, निगडी) याला अटक केली आहे. याबाबत पीडित मुलीने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    आरोपी पवार याने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून तिला रुपीनगर येथील एका मंदिराच्या पाठीमागे, एका महाविद्यालयात वारंवार भेटण्यासाठी बोलावले. त्याच्या दुचाकीवरून पीडित मुलीला मोशी येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यामुळे मुलगी गरोदर राहिली. मुलगी सहा महिन्यांची गरोदर असताना हा प्रकार उघडकीस आला. चिखली पोलिस तपास करत आहेत.