धक्कादायक ! तरुणीवर कारमध्ये बलात्कार; पुण्यातील घटना

ओळखीतल्या तरुणीला जेवण करण्यास कारमध्ये घेऊन जाताना तिच्यावर कारमध्ये बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. खराडी ते लोणी काळभोर यादरम्यान ही घटना घडली आहे.

    पुणे : ओळखीतल्या तरुणीला जेवण करण्यास कारमध्ये घेऊन जाताना तिच्यावर कारमध्ये बलात्कार (Rape in Pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे. खराडी ते लोणी काळभोर यादरम्यान ही घटना घडली आहे.

    याप्रकरणी विवेक सिद्धार्थ गाडेकर (वय 30) याला अटक केली आहे. याबाबत 20 वर्षीय तरुणीने चंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे ओळखीतले आहेत. गुरुवारी या तरुणीला आपण बाहेर जेवायला जाऊ. मला तुझ्याबरोबर वेळ घालवायचा आहे, असे म्हणून कारमधून तिला घेऊन बाहेर गेला.

    खराडी परिसरातील एका ढाब्यावर त्यांनी जेवण केले. त्यानंतर घरी परत जात असताना रस्त्याच्या बाजूला गाडी थांबवून कारमध्ये बलात्कार केला. दरम्यान, या सर्व प्रकारानंतर तरुणीने तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.