प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

विनापरवाना दारूविक्री करण्यासाठी जात असलेल्या एका युवकाला लोणावळा शहर पोलिसांनी मुद्देमालासह अटक करीत कारवाई केली आहे. संबंधित युवकाकडून पोलिसांनी दहा हजार रुपयांची दारू आणि एक दुचाकी असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    लोणावळा : विनापरवाना दारूविक्री करण्यासाठी जात असलेल्या एका युवकाला लोणावळा शहर पोलिसांनी मुद्देमालासह अटक करीत कारवाई केली आहे. संबंधित युवकाकडून पोलिसांनी दहा हजार रुपयांची दारू आणि एक दुचाकी असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    आरोपी शेरा रामप्रकाश गुर्जर (वय २२) हा त्याच्याकडील दुचाकीवरून एका पांढऱ्या बॉक्समधून ब्लेंडर प्राईड या कंपनीच्या प्रत्येकी २ लिटर मापाच्या ३ दारूच्या बाटल्या घेऊन जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यावर त्याला अटक करण्यात आली. या कारवाईच्या अनुषंगाने यापुढे शहरात कुठल्याही प्रकारचे बेकायदेशीर अवैध धंदे करू दिले जाणार नसल्याचा संदेश नवनियुक्त पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांनी दिला आहे.