सांगली जिल्ह्यातील ३३ कोविड रुग्णालये बंद ; कोरोना आटोक्यात आल्याने जिल्हा प्रशासनाचा निर्णय

या रुग्णालयांत नवीन रूग्ण दाखल करून घेऊ नयेत. रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर रुग्णालयातील फॅसिलिटीवरील सर्व माहिती अद्ययावत करावी. प्रशासनाकडून व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरविले असल्यास ते परत करावेत. रुग्णालयातील अंतर्गत व बाह्य स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करूनच स्रणसेवा बंद करावी.

    सांगली : कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येऊ लागल्याने जिल्ह्यातील ३३ कोविड रुग्णालये बंद केली आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेमधील रुग्णांची संख्या वाढल्यास ही रुग्णालये पुन्हा सुरू करण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

    ते म्हणाले, या रुग्णालयांत नवीन रूग्ण दाखल करून घेऊ नयेत. रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर रुग्णालयातील फॅसिलिटीवरील सर्व माहिती अद्ययावत करावी. प्रशासनाकडून व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरविले असल्यास ते परत करावेत. रुग्णालयातील अंतर्गत व बाह्य स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करूनच स्रणसेवा बंद करावी.

    बंद केलेली रुग्णालये अशी : उमा चॅरिटेबल हॉस्पिटल (जत), कोविड हॉस्पिटल (तासगाव), सद्गगुरू हॉस्पिटल (विटा), स्वस्तिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (शिराळा), श्रीनाथ डीसीएससी (आटपाडी), नूतन डीसीएचसी (कवठेमहांकाळ), स्पंदन डीसीएचसी (कडेगाव), मनमंदिर डीसीएचसी (विटा), जीवनधारा हॉस्पिटल (विटा), मातोश्री डीसीएचसी (खानापूर), श्री छत्रपती शिवाजीराजे डीसीएचसी (आळसंद, ता. खानापूर),

    वेधहॉस्पिटल डीसीएचसी (तासगाव), पार्वती डीसीएचसी (तासगाव), सदिच्छा कोविड डीसीएचसी (आष्टा ), ख्वाजा गरीब नवाज डीसीएचसी (इस्लामपूर), मातोश्री डीसीएचसी (कासेगाव, ता. वाळवा), सहारा कोविड हॉस्पिटल (इस्लामपूर), शिवगंगा डीसीएचसी (पाटगाव, ता. मिरज) डॉ. रवींद्र वाळवेकर हॉस्पिटल (सांगली), डॉ. महेश दुदनकर हॉस्पिटल (सांगली) संजीवनी मल्टीकेअर हॉस्पिटल एलएलपी (कुपवाड), डॉ. शरद घाटगे, घाटगे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (सांगली), सायना क्लिनिक अॅण्ड हेल्थ सेंटर (सांगली), डॉ. दीपक

    शिखरे लाईफ केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (सांगली), डॉ. विठ्ठल माळी नोबल डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (मिरज), डॉ. अनिल मडके, श्वास हॉस्पिटल (सांगली), भगवान महावीर कोविड केअर सेंटर (सांगली), डॉ. कपिल उपाध्ये त्रिशला हॉस्पिटल (सांगली), डॉ. सुरेश पाटील हेल्थ पॉईंट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (मिरज), डॉ. तुषारपड्ढे शिवकृपा डेडिकेटेड कोविड केअर हॉस्पिटल (मिरज), न्यू लाईफ कोविड केअर सेंटर (सांगली), नमराह कोविड सेंटर (सांगली), डॉ. वसंत बुर्ले संस्कृती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (सांगली)