प्रशासक शंकर कवितके यांच्याकडे शिरोळ पंचायतीचा कार्यभार

शिरोळ पंचायत समिती प्रशासन स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव विशेष अभियान राबविण्यात आघाडीवर असून, रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजने करिता कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

    शिरोळ : शिरोळ पंचायत समिती प्रशासन स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव विशेष अभियान राबविण्यात आघाडीवर असून, रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजने करिता कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. तर प्रत्येक गावात सार्वजनिक शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट जवळपास पूर्ण होत आले आहे.

    १४ मार्च रोजी विद्यमान सदस्यांची मुदत संपल्याने प्रशासक म्हणून गटविकास अधिकारी के यांशंकर कवितनीर स्वीकारल्याने अनेक विकासकामे पूर्णत्वाला चालले आहे.

    रमाई आवास योजनेअंतर्गत चालू वर्षामध्ये १४८ प्रस्ताव या योजनेकरिता प्राप्त झाले होते ते सर्व मंजूर झाले आहेत. याकरिता २.२५ लाख रु.निधी जमा आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रत्येक गावात प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात आले असून ,चालू वर्षांत ५८१लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. पहिल्या हप्ता वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ,या योजनेकरिता ८.७५ लाखांचा निधी जमा आहे .

    तालुक्यातील बचत गटांना चालूवर्षी १६ कोटी रूपयांचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट होते. पैकी फेब्रुवारीअखेर १३ कोटी रु. रकमेचे वाटप करण्यात आले आहे. चालू वर्षी तालुक्यातील ५२ गावामध्ये प्रत्येकी एक सार्वजनिक शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट होते , त्यापैकी ३८ गावांत सार्वजनिक शौचालयाची उभारणी झाली आहे.