राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्यावर दबाव आणत आहे. शरद पवार हे शिवसेना संपवायचे काम करत आहेत. वाझेंना निलंबित केले जाते. तर शरद पवार आता अनिल देशमुख यांना का वाचवत आहेत? उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत. त्यांनी योग्य निर्णय घ्यावा, असं चंद्रकांत पाटील बोलत होते.

    सांगली : मुंबईच्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. या पत्रानंतर अनिल देशमुख यांनीही एक पत्रक काढत आपली बाजू मांडली असून आरोप सिद्ध करावेत अन्यथा परमबीर सिंह यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणावरुन राज्याच विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकाकंडून होत आहे. याचं पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

    परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर राज्यातील वेगवेगळ्या भागात भाजपच्या वतीने निदर्शणे करण्यात येत आहेत. दरम्यान याचं पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी त्यांनी पत्रकारशी संवाद साधला. म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावामुळे सचिन वाझे यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले. संजय राठोड यांच्यामुळे सरकारची प्रतिमा मलीन होते, मग धनंजय मुंडे यांच्यामुळे होत नाही का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

    दरम्यान परमबीर सिंह यांचे आरोप खोटे असल्याचा दावा गृहमंत्री करत असतील तर त्याची चौकशी व्हावी. गेल्या वर्षभरापासून सरकारला हप्ते योग्य पद्धतीने पोहोचत होते. अंबानी स्फोटक प्रकरणात नीट चौकशी झाली नाही, हे गृहमंत्र्याना आता समजलं का ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही गोष्ट माहिती नव्हती का? या गोष्टीची मुख्यमंत्र्यांना कल्पना नसेल, तर मी कोरोनाला घाबरून मातोश्रीवर लपून बसलो होतो, हे त्यांनी मान्य करावे. तुम्हाला कोणत्या गोष्टीचा माहिती नसेल तर तुम्ही राजीनामा द्यावा, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.