प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

मिरज बसस्थानक परिसरात (Miraj Bus Stand Area) नरवाडकर पेट्रोलपंपावर बेवारस बॅग व पोते आढळल्याने खळबळ उडाली. पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी बॉम्बशोधक पथकाकडून बॅग व पोत्याची तपासणी केली. या बॅगेमध्ये कपडे व इतर वस्तू सापडल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

    मिरज : मिरज बसस्थानक परिसरात (Miraj Bus Stand Area) नरवाडकर पेट्रोलपंपावर बेवारस बॅग व पोते आढळल्याने खळबळ उडाली. पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी बॉम्बशोधक पथकाकडून बॅग व पोत्याची तपासणी केली. या बॅगेमध्ये कपडे व इतर वस्तू सापडल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
    मिरज बसस्थानक अत्यंत गजबजलेला परिसर असून, समोरील पेट्रोलपंपावर कोणीतरी बेवारस बॅग व पोते ठेवून गेले होते. बेवारस बॅगेमुळे घबराट निर्माण झाली होती. बॉम्बशोधक पथक घटनास्थळी येऊन बॅगेची व पोत्याची तपासणी केली. बॅगेमध्ये कपडे व  इतर प्रापंचिक वस्तू आढळल्या. बॅग व पोते पोलिस पथकाने पोलीस ठाण्यात आणले. मात्र, या घटनेमुळे काही काळ सर्वाची धावपळ उडाली होती. याबाबत शहर पोलिसात नोंद आहे.