‘बिग बाॅस’ विजेता विशाल निकम यांची बैलगाडीतून मिरवणूक

'बिग बाॅस' (Big Boss) पर्व तीन विजेता विशाल निकम याची जन्मगाव असणाऱ्या खानापूर तालुक्यातील देविखिंडी येथे बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावकऱ्यांनी 'जोतिबाच्या नावानं चांगभलं,‌ चा जयघोष करीत फटाक्यांची आतिषबाजी स्वागत करण्यात आले.

    विटा : ‘बिग बाॅस’ (Big Boss) पर्व तीन विजेता विशाल निकम याची जन्मगाव असणाऱ्या खानापूर तालुक्यातील देविखिंडी येथे बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावकऱ्यांनी ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं,‌ चा जयघोष करीत फटाक्यांची आतषबाजी स्वागत करण्यात आले. कलर्स वाहिनीवरील बिग बाॅस पर्व तीनचा विजेता देविखिंडी चा विशाल निकम ठरला. हा  निकिल जाहीर होताच गावांमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करुन गावाने आनंदोत्सव साजरा केला.
    विशालचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण गावातच झाले. महाविद्यालयीन शिक्षण विट्याच्या बळवंत महाविद्यालयात झाले. विशाल ने बिग बाॅस च्या घरात शंभर दिवस राहून वेगवेगळे आव्हांना सामोरे जात अंतिम विजेतेपद पटकावले. महिलांनी घरी औक्षण करण्यात आले. विशालने‌ २० लाखांचे बक्षीस मिळवत त्याने चाहत्यांची मने जिंकली.
    विशालच्या गाजलेल्या भूमिका
    विशालने दख्खनचा राजा जोतिबा, जय भवानी, यासारख्या मालिकांमध्ये काम केले. मिथून चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. धमूस या मराठी चित्रपटात काम केले आहे. सात जलमाच्या गाठी या मालिकेद्वारे विशाल‌ घरोघरी पोहोचला.
    “मातीनं जसं घडवलं. तेच बिग बाॅस घरात दिसलं. या मातीच्या ओढीने विजेतेपद मिळताच. गाव गाठलं. माझ्या यशात आई वडिल यांच्या सह मायबाप रसिकांनी महत्त्वाचा वाटा आहे. “