चंदन चव्हाण यांची गुंठेवारी समितीच्या राज्य प्रमुखपदी निवड

    सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : गुंठेवारी चळवळीचे (Gunthewari Samiti) जनक चंदन चव्हाण यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून पक्षप्रवेश दिला. तसेच शिवसेना गुंठेवारी विकास समितीच्या महाराष्ट्र राज्य प्रमुखपदी निवड जाहीर केली.

    यावेळी शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई, उपनेते नितीन बानुगडे पाटील, सांगली जिल्हाप्रमुख संजय विभूते, आनंदराव पवार, बाबासाहेब सपकाळ, डॉ. किशोर ठाणेकर, नाना शिंदे, मिलिंद दाभाडे, सुरेश साखळकर आदी उपस्थित होते.

    गुंठेवारी चळवळ संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य ही संघटना १९९४ पासून कार्यरत आहे. तिला शिवसेनेत विलीन करण्यात आले.

    ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अनिल देसाई, नितीन बानुगडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात शहरी, ग्रामीण भागातील गुंठेवारी जनतेला आपण न्याय देणार असून, शहरी भागातील नागरिकांची घरे कायद्याच्या चाकोरीत बसवून त्यांची घरे मालकी हक्काची होण्यासाठी प्रयत्न करणार’.

    – चंदन चव्हाण, शिवसेना गुंठेवारी समिती राज्यप्रमुख.