विक्रम सावंत
विक्रम सावंत

आमदार विक्रम सावंत यांच्या विरोधात जत तालुक्यातील मंत्री जयंत पाटील यांचे समर्थक बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे हे भाजपप्रणीत शेतकरी विकास पॅनल मधून उमेदवार होते. जयंत पाटील यांच्या समर्थकाने आमदार विक्रम सावंत यांचा पराजय केल्यामुळे जिल्हाभर जयंत पाटील यांनीच विक्रम सावंत यांचा 'करेक्ट' कार्यक्रम केला असल्याची चर्चा आहे.

    सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रम सावंत यांचा ५ मतांनी पराजय झाला आहे. काँग्रेसचे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या गटाला हा धक्का मानला जात आहे.

    प्रकाश जमदाडे

    आमदार विक्रम सावंत यांच्या विरोधात जत तालुक्यातील मंत्री जयंत पाटील यांचे समर्थक बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे हे भाजपप्रणीत शेतकरी विकास पॅनल मधून उमेदवार होते. जयंत पाटील यांच्या समर्थकाने आमदार विक्रम सावंत यांचा पराजय केल्यामुळे जिल्हाभर जयंत पाटील यांनीच विक्रम सावंत यांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम केला असल्याची चर्चा आहे.

    आमदार विक्रम सावंत यांच्या उमेदवारीसाठी राज्यमंत्री विश्वजीत कदम सुरवातीपासून हट्ट धरला होता, शिवाय मंत्री कदम यांच्या हट्टासाठीच निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही, त्यांनी भाजपच्या काही उमेदवारांना बिनविरोध घेण्यास विरोध केला असल्याची चर्चा आहे.