माथाडी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी निदर्शने

    सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सांगली जिल्हातील माथाडी कायद्याच्या अमंलबजावणी व इतर मगण्यासाठी माथाडी मंडळ व मंडळातील कर्मचारी यांच्या बेलगाम कारभाराविरुद्ध सांगली जिल्हा हमाल पंचायतच्या वतीने मार्केटयार्डमधील माथाडी मंडळ कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून निर्देशने करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व विकास मगदुम, बाळासाहेब बंडगर, रामचंद्र बंडगर, श्रीमंत बंडगर, आदगोंडा गौंडाजे यांनी केले.

    माथाडी मंडळ कार्यालयात पुर्ण क्षमतेने अधिकारी-निरिक्षक पुर्ण वेळ नाहीत. फक्त एकच निरिक्षक सध्या काम करत आहेत. सांगली माथाडी मंडळाकडे पुर्ण वेळ तीन निरिक्षकांची नेमणुक करण्यात यावी, मंडळाकडे दरमहा कोटयावधी रूपयाची उलाढाल होते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, हिशोब व्यवस्थित व वेळच्यावेळी ठेवण्यासाठी, आर्थिक लेखापरिक्षण वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी स्वातंत्र लेखापाल नेमावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. मागण्याची मान्य न झाल्यास हमाल पंचायतीस तीव्र आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला.

    मंडळाच्या स्थापनेपासून असलेले दोन निरिक्षक सेवा निवृत्त होऊन चार-पाच वर्षे झाले, दोन क्लार्क व एक शिपाई सेवानिवृत्त झाले, दोन क्लार्कचे निधन झाले. सध्या कर्मचारी वर्ग अपुरा आहे. त्या जागेवर नवीन अधिकारी-कर्मचारी भरती केलेली नाही, त्यामुळे कर्मचारी भरती करावी. भरतीवेळी नोंदणीकृत माथाडी कामगारांचे सक्षम मुला-मुलींना प्राधान्य देऊन त्यामधून भरती करण्यात यावी.”

    – विकास मगदूम, माथाडी नेते