भाजप पश्चिम मंडलाच्यावतीने रोगनिदान शिबीर

भाजपा पश्चिम मंडल व सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने गरजवंतांना साठी सामाजिक उपक्रम या अंतर्गत सर्व रोग निदान व उपचार शिबिर घेण्यात आले.टिळक स्मारक मंदिर सांगली येथे हे शिबीर संपन्न झाले.

    सांगली : पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण भारतात सेवा सप्ताह चालू आहे, त्यानिमित्ताने भाजपा पश्चिम मंडल व सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने गरजवंतांना साठी सामाजिक उपक्रम या अंतर्गत सर्व रोग निदान व उपचार शिबिर घेण्यात आले.टिळक स्मारक मंदिर सांगली येथे हे शिबीर संपन्न झाले.

    लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिबिरास सुरुवात करण्यात आली यावेळी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, माजी आमदार दिनकर पाटील, अरविंद पाटील निलंगेकर, दीपक माने, केदार खाडिलकर, श्रीकांत शिंदे, पृथ्वीराज पवार, डॉ साठे, विजय भिडे व भागातील नगरसेवक युवराज बावडेकर, सुबराव मद्रासी, नगरसेविका उर्मिला बेलवलकर, भारती दिगडे भाजप पदाधिकारी अविनाश मोहिते, उदय बेलवलकर, सचिन कोरे, मोहन जामदार, नचिकेत कुलकर्णी, अमित कुलकर्णी, महिला मोर्चाचे स्मिता भाटकर,माधुरी वसगडेकर, दिव्या कुलकर्णी,उज्वला कोठावळे, रेखा पवार, गीता भोसले,कलावती भोसले व सर्व भागातील नागरिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या सर्व शिबिराचे नियोजन भाजपा पश्‍चिम मंडल अध्यक्ष दीपक कर्वे, युवा मोर्चा सरचिटणीस प्रथमेश वैद्य, सचिव शांतिनाथ कर्वे, अनिकेत खिलारे यांनी केले.