gopichand padalkar
gopichand padalkar

महामंडळाला आवश्यक नसणारे हजारो कोटींचे टेंडर काढायचे आणि ती देणी देण्यासाठी तरतूद करायचे. परंतु कर्मचाऱ्यांचे मुलभूत पगार द्यायचे नाहीत. हे नेमकं कोणाच्या टक्केवारीसाठी सुरू आहे?, महामंडळातील सचिन वाझे नेमका कोण? हे पाहायला लागणार आहे.

    सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : एसटी कर्मचाऱ्यांचे पगार व इतर देय रकमा गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित आहेत, याच प्रश्नावर आता आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आवाज उठवला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ द्या, अन्यथा संघर्ष अटळ असल्याचा इशारा आमदार पडळकर यांनी राज्य शासनाला दिला आहे.

    पडळकर म्हणाले, मोठ्या विश्वासाने महाराष्टट्रातल प्रवासी आजही एस.टी.नेच प्रवास करतो. ज्यांच्या कष्टाने, मेहनतीन एस.टी.महामंडळ उभा राहिलं, त्या मराठी कर्मचााऱ्यांवर आत्महत्येची वेळ यावी, ही अपमानास्पद बाब आहे. तुटपुंजा पगार, तोही वेळेत नाही. ठाकरे सरकार आल्यापासून कर्मचाऱ्यांचा वेतन करार अजून झालेला नाही. महामंडळाला आवश्यक नसणारे हजारो कोटींचे टेंडर काढायचे आणि ती देणी देण्यासाठी तरतूद करायचे. परंतु कर्मचाऱ्यांचे मुलभूत पगार द्यायचे नाहीत. हे नेमकं कोणाच्या टक्केवारीसाठी सुरू आहे?, महामंडळातील सचिन वाझे (Sachin Waze) नेमका कोण? हे पाहायला लागणार आहे.

    उद्या कर्मचाऱ्यांसोबत बैठक

    या प्रश्नांविरोधात कामगार युनियनने आवाज उठवायला हवा. मात्र, युनियन प्रस्थापितांच्या तालावरती नाचत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना मी अवाहन करतो की, यासाठी आता आपण एकत्र येऊन लढा उभारून सरकारला आपल्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडू, त्यासाठी उद्या २१ सप्टेंबर रोजी झरे (ता.आटपाडी) येथे आयोजित बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.