अबब! मेंढपाळ झाला लखपती ; माडग्याळी मेंढीला मिळाला विक्रमी दर

कुलाळवाडी,सिद्धनाथ हे या मेंढीचे जन्मस्थान आहे, मात्र कुलाळवाडीत शेळ्या-मेंढयांचा बाजार भरत नाही.त्यामुळे कुलाळवाडीसह आसपासच्या सर्व गावातील मेंढपाळ बांधव आपल्या शेळ्या मेंढ्यांची खरेदी-विक्री करण्यासाठी माडग्याळच्या बाजारात येतात.परिणामी या बाजारावरुनच या मेंढीला "माडग्याळ मेंढी" असे नाव पडले आहे.सध्या तो याच नावाने जगभर ओळखली जाते.

    जत : माडग्याळ ता.जत येथील जनावर बाजारात मायाप्पा चौगुले या शेतकऱ्याच्या मेंढीना मिळाला तब्बल सव्वा दोन लाखाचा विक्रमी दर.सरासरी एका मेंढीची किंमत २ लाख ३३ हजाराच्या दराने खरेदी झाली.यामुळे माडग्याळ मेंढी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

    माडग्याळ येथील जनावर बाजार आवारात भरलेल्या बाजारात मायाप्पा चौगुले या शेतकऱ्याच्या  सहा मेंढ्यांची चौदा लाख रुपयाने किंमतीने विक्री झाली आहे.या मेंढ्या उमदी येथील रमेश कराळे यांनी खरेदी केल्या आहेत.मेंढीने तिच्या अंगभूत सौदर्याने जगभरातील पशुपालक,मेंढपाळ,शेतकरी आणि प्राणी मित्रांना भूरळ घातली आहे.मेंढ्यांची विक्रमी दराने विक्री झाल्याने शेतकरी व गावकऱ्यांनी मेंढ्यांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली.

    माडग्याळी मेंढी हे जतचे वैभव समजले जाते.माडग्याळ मेंढीचे संवर्धन व्हावे यासाठी येथे जत येथे काही दिवसांपूर्वी माडग्याळ मेंढी यात्रेचे नियोजन करण्यात आले होते.त्यामुळे तिच्या मूळ भौगोलिक उगमस्थानाची,जन्माची नोंद करण्यासाठी आपण लढा उभारला आहे. त्याला हळूहळू यश मिळत आहे.

    माडग्याळ मेंढी चे वैशिष्ट्ये

    मेंढीचे रुबाबदार नाक
    वजनाची जलद वाढ
    खाण्यास चवदार मटण
    वर्षाला हमखास तीन पिल्ले
    कमीत कमी चारा
    चांगले उत्पन्न

    माडग्याळ मेंढीचे उगमस्थान
    कुलाळवाडी,सिद्धनाथ हे या मेंढीचे जन्मस्थान आहे, मात्र कुलाळवाडीत शेळ्या-मेंढयांचा बाजार भरत नाही.त्यामुळे कुलाळवाडीसह आसपासच्या सर्व गावातील मेंढपाळ बांधव आपल्या शेळ्या मेंढ्यांची खरेदी-विक्री करण्यासाठी माडग्याळच्या बाजारात येतात.परिणामी या बाजारावरुनच या मेंढीला “माडग्याळ मेंढी” असे नाव पडले आहे.सध्या तो याच नावाने जगभर ओळखली जाते.