इस्लामपुरात गेल्या पाच वर्षांत नाविण्यपूर्ण विकासकामे झाली का?; जयंत पाटलांचा प्रश्न

इस्लामपूर शहरात गेल्या पाच वर्षात नाविण्यपूर्ण विकासकामे झाली का? शहरात प्रश्न कमी करण्याऐवजी ते वाढतच गेले आहेत. ते सोडवणे आणि रेंगाळलेल्या मोठ्या प्रकल्पाना गती देण्याच्या उद्देशाने नगरपालिकेत आज आढावा बैठक घेतली.

  इस्लामपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : इस्लामपूर शहरात गेल्या पाच वर्षात नाविण्यपूर्ण विकासकामे झाली का? शहरात प्रश्न कमी करण्याऐवजी ते वाढतच गेले आहेत. ते सोडवणे आणि रेंगाळलेल्या मोठ्या प्रकल्पाना गती देण्याच्या उद्देशाने नगरपालिकेत आज आढावा बैठक घेतली. बरेच प्रश्न आणि प्रकल्प अपुरे आहेत. ते पूर्णत्वाला नेऊ विविध योजना मंजूर करून लागेल तेवढा निधी राज्य सरकार उपलब्ध करून देईल, असा विश्वास पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला.

  मंत्री जयंत पाटील म्हणाले, “शहरातील भुयारी गटारीचा प्रश्न गंभीर आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणात रस्ते खुदाई झाली आहे. यात पाणीपुरवठ्याच्या अनेक पाईपलाईनला गळती लागल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. नवी २४ बाय ७ पाणी योजना कार्यन्वित करणार आहोत. भुयारी गटारीसाठी एसटीपी जागा ताब्यात घेण्यासाठी स्वतः प्रयत्न केले आहेत. एका जागेच्या मालकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्याशी समझोता झाला आहे. याबाबत तातडीने निर्णय होईल. शहरातील रस्ते गतीने सुरू आहेत.

  • बेघर वसाहतमधील पाणी प्रश्न व गळती निकाली काढणार
  • बेघर वसाहत परिसरातील सभागृहाला पंचवीस लाखांची तरतूद करणार
  • शहरात गॅस पाईपलाईन, हायस्पीड नेटसाठी परवानगी देताना नगरपालिका नुकसान टाळणार
  • पालिकेच्या करांचे पैसे भरण्यासाठी आधुनिकतेची कास धरताना ऍप विकसित करणार.
  • पाणी प्रश्न निकाली काढताना चोवीस बाय सात योजना कार्यान्वित करण्यासाठी निधी उपलब्ध करणार
  • शहरातील अत्याधुनिक भाजीमंडई, मटण आणि फिश मार्केटसाठी निधीची तरतूद करणार.
  • वाहतूक आणि पार्किंगचा प्रश्न निकाली काढणार
  • गुंठेवारीचे प्रश्न निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखणार
  • रमाई आवास योजनेसाठी २१३ लाभार्थ्यांना राज्य सरकारकडून निधी दिला आहे. केंद्र सरकारच्या निधीसाठी पाठपुरावा करणार.