अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या मित्रांसोबत वाद गेला विकोपाला, गळा चिरुन डोक्यात घातला दगड

मृत गोविंदा यालाही अंमली पदार्थाचे व्यसन होते. त्याची आई निवृत्त रेल्वे कर्मचारी होती. राहत्या घरापासून थोड्याच अंतरावर गोविंदाचा गळा चिरुन डोक्यात दगड टाकून खून करण्यात आला आहे. परंतु खुणाचे नेमके कारम अद्याप समजू शकले नाही.

मिरज : अंमली पदार्थ सेवन ( drug addict) करणाऱ्या मित्रांसोबत झालेला वाद  (argument ) तरुणाच्या जिवावर बेतला आहे. मिरजेत रेल्वे कर्मचारी वसाहतीजवळ समतानगर येथे तरुणाचा गळा चिरुन डोक्यात घालून खून करण्यात आला आहे. ही घटना रविवारी उघडकीस आल्याने समजली आहे. हत्या झालेल्या तरुणाचे नाव गोविंदा मुक्तिकोळ असे आहे. या तरुणाचा खून मित्रांसोबत झालेल्या वादामुळे झाल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.

मृत गोविंदा यालाही अंमली पदार्थाचे व्यसन होते. त्याची आई निवृत्त रेल्वे कर्मचारी होती. राहत्या घरापासून थोड्याच अंतरावर गोविंदाचा गळा चिरुन डोक्यात दगड टाकून खून करण्यात आला आहे. परंतु खुणाचे नेमके कारम अद्याप समजू शकले नाही. अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या मित्रांसोबत भांडण झाली असावी आणि त्यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने मित्रांणीच हत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.