नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांची रविवारी प्रकट मुलाखत

इस्लामपूर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांची प्रकट मुलाखत प्रसिध्द निवेदक सुधीर गाडगीळ घेणार आहेत. ही प्रकट मुलाखत रविवारी (दि.२) सायंकाळी ६ वाजता इस्लामपूर येथील राजारामबापू नाटयगृह येथे होणार असल्याची माहिती निशिकांतदादा युथ फौंडेशन व निशिकांतदादा स्पोर्टस फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

    इस्लामपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : इस्लामपूर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील (Nishikant Patil) यांची प्रकट मुलाखत प्रसिध्द निवेदक सुधीर गाडगीळ घेणार आहेत. ही प्रकट मुलाखत रविवारी (दि.२) सायंकाळी ६ वाजता इस्लामपूर येथील राजारामबापू नाटयगृह येथे होणार असल्याची माहिती निशिकांतदादा युथ फौंडेशन व निशिकांतदादा स्पोर्टस फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

    नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांची संघर्षमय वाटचाल, शिक्षण, आरोग्य क्षेत्रातील यशस्वी प्रवास, समाजकार्य, अलिकडील राजकारणातील प्रवास, गेल्या पाच वर्षातील शहरातील विकासात्मक वाटचाल व भविष्यातील व्हिजन या विषयाच्या अनुषगांने निशिकांतदादांच्या वाटचालीतील घडामोडी व भविष्यातील वाटचाल याची पाने या मुलाखतीत उघडली जाणार आहेत.

    या मुलाखतीचे थेट प्रेक्षेपण फेसबुक, ट्विवर, इस्टाग्राम, यू-ट्युबवर पाहता येणार आहे. व्हॉट्सऍपवर लिंक पाठवली जाणार आहे. तरी या कार्यक्रमास शहरातील नागरिक, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिक्षण, आरोग्य क्षेत्रासह अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

    कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाजपा वाळवा तालुका अध्यक्ष धैर्यशील मोरे, वाळवा तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपा शहर अध्यक्ष अशोकराव खोत, भाजपा जिल्हा सरचिटणीस संजय हवलदार, भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर हुबाले, प्रांजली अर्बन निधी बँकेचे चेअरमन संदीप सावंत, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखा जगताप, स्मिता पवार, युवा नेते अजित पाटील, अक्षय पाटील, भाजप युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सतेज पाटील, संघटन सरचिटणीस प्रविण परीट, अक्षय कोळेकर, विकास परीट, सुयश पाटील, गौरव खेतमर, अल्ताफ तहसीलदार, मुकुंद रास्कर, संदीपराज पवार, कुलदीप खांबे, अशोक भिंगार्डे आदीसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते विशेष परीश्रम घेत आहेत.