नगराध्यक्ष निशिकांत पाटील
नगराध्यक्ष निशिकांत पाटील

राष्ट्रवादीच्या विचाराची सत्ता सलग ३१ वर्षे होती. मात्र हे सत्ताधारी या शहरातील नागरीकांना नागरी सुविधा देऊ शकले नाहीत. शहरातील अनेक प्रश्न प्रलंबीत राहीले विकास आघाडी व मित्र पक्ष शिवसेना यांनी गत निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का देत ३१ वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला. याची सल आज ही राष्ट्रवादीला आहे . राज्यातील सत्ता बदल झाला आणि उरुण -इस्लामपूर नगरपरीषदेचे सभागृह विकासकामे व राष्ट्रवादीचे नगरसेवक यांच्या जनरल मिटींग च्या दांड्यनी गाजत आहे.

    विनोद मोहिते, इस्लामपूर : राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या प्रि प्लॅन दांड्यानी आणि नगरपालिका प्रशासनाचा वेळकाढु पणामुळे वर्षभरात शहराच्या विकासावर परीणाम झाला आहे . शहराच्या व नागरीकांच्या सोयीसुविधेसाठी चक्क लोकनियुक्त नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी शहरातील रस्ते स्वखर्चातुन करणेसाठी ना हरकत दाखला मिळावा म्हणून थेट नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांकडे पत्राव्दारे विनंती केली आहे.

    याबाबत माहिती देताना भाजपा शहर अध्यक्ष अशोकराव खोत म्हणाले , राष्ट्रवादीच्या विचाराची सत्ता सलग ३१ वर्षे होती. मात्र हे सत्ताधारी या शहरातील नागरीकांना नागरी सुविधा देऊ शकले नाहीत. शहरातील अनेक प्रश्न प्रलंबीत राहीले विकास आघाडी व मित्र पक्ष शिवसेना यांनी गत निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का देत ३१ वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला. याची सल आज ही राष्ट्रवादीला आहे . राज्यातील सत्ता बदल झाला आणि उरुण -इस्लामपूर नगरपरीषदेचे सभागृह विकासकामे व राष्ट्रवादीचे नगरसेवक यांच्या जनरल मिटींग च्या दांड्यनी गाजत आहे. विकास आघाडी व मित्र पक्ष शिवसेना यांचा सत्तेतील कार्यकाळ संपत आला आहे . मागील सभागृहात मंजुर ठरावातील कामे प्रशासनाचा वेळकाढूषणामुळे ठप्प आहेत , यावरुन ही सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरले मात्र प्रशासन आज ही सुस्त आहे . प्रशासन कोणाच्या दबावाखाली आहे का ? किंवा प्रशासन वेळकापणा का करते आहे हे शहरातील जनतेला ज्ञात आहे. आम्ही सत्ताधारी याचा हिशोब येणाऱ्या निवडणुकीत देणार आहे यात शंका नाही .

    राष्ट्रवादी व प्रशासन यांचा अलीकडील वर्षातील एकोपा शहरातील खेळखंडोबाला कारणीभूत ठरला आहे . लोकनियुक्त नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी कारभारातील पादर्शकता व विकासकामातील दर्जेदारपणा टिकवत शहाराचा विकासात्मक चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला वेळ प्रसंगी त्यांना सभागृहात कणखर भूमिका घ्यावी लागली तर प्रशासनाचा वेळकाढपणा व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची सभागृहातील मिटींगमधील विकासकामांना कधी विरोध तर कधी अनुउपस्थिती ही पेच निर्माण करणारी ठरली. या अवस्थेत शहरातील विकासाची गती मंदावली.

    हे आहेत रस्ते ..!

    शहरातील नागरीकांच्या अपेक्षा व विकासकामाची बांधीलकी जपत लोकनियुक्त नगराध्यक्ष निशिकांत पाटील ( दादा ) यानी शहरातील झरी नाका ते निराळे मामा दुकानापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करणे , संभाजी चौक ते जीवनमामा दुकानापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करणे,सावकर कॉलनी ते कडगावे घरापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करणे, मणिकंडन हॉटेल ते पोस्ट ऑफीस ते विजय लाईट हाऊसपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करणे, मटण मार्केट दुर्गा रेस्टॉरंटपर्यतच्या रस्त्याचे डांबरीकरण करणे, वरील प्रमाणे रस्ते नगरपरीषद फंडातुन व शासन योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाहीत. त्या रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे . या भागातील नागरीक वारंवार रस्ता करणेबाबत विनंती करत आहेत , रस्त्याची कामे होणे आवश्यक व निकडीचे असल्याने मी लोकनियुक्त नगराध्यक्ष या नात्याने माझे प्रथम कर्तव्य असल्याने वरील रस्ते स्व खर्चातुन करणार आहे , तरी या कामी मला नाहरकत दाखला मिळावा अशी मागणी मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्याकडे लेखी केली आहे .