
कॉम्रेड देसाई म्हणाले,' लोकांची वैचारिक भूख या मासिकातून भागविली जाईल.समतेवर आधारित समाज निर्मिती साठी अशा मासिके,नियतकालिकांनी कटिबध्द रहावे.समाज प्रबोधनाचे हत्यार म्हणून मासिकानी काम करणे अपेक्षित आहे.अंधश्रध्दा निर्मूलन पत्रिकेला राज्यभरातून चांगली प्रतिसाद मिळत आहे.
इस्लामपूर : “प्रस्थापितांच्या बाजूने उभे राहणाऱ्या लोकांना जागे केले पाहिजे, सामाजिक चळवळीकडे गांभीर्याने पाहून सर्वांनी मदतीची भूमिका घेतली पाहिजे.संघटनेची वैचारिक भूमिका नेणाऱ्या मुखपत्रे चालली पाहिजेत,”असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड संपत देसाई यांनी व्यक्त केले.येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र ” अंधश्रध्दा निर्मूलन पत्रिका” वार्षिक अंकाचे प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.शामराव( अण्णा) पाटील होते.
यावेळी कॉम्रेड देसाई म्हणाले,’ लोकांची वैचारिक भूख या मासिकातून भागविली जाईल.समतेवर आधारित समाज निर्मिती साठी अशा मासिके,नियतकालिकांनी कटिबध्द रहावे.समाज प्रबोधनाचे हत्यार म्हणून मासिकानी काम करणे अपेक्षित आहे.अंधश्रध्दा निर्मूलन पत्रिकेला राज्यभरातून चांगली प्रतिसाद मिळत आहे.
प्रा.बी आर जाधव यांनी स्वागत ,प्रस्ताविक केले.प्रा एकनाथ पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.संघटना आणि मासिकाबाबतची भूमिका प्रा डॉ नितीन शिंदे ,महा. अं नि स चे प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी व्यक्त केली.प्राचार्य एस बी माने,वनाधिकारी अरविंद कांबळे,प्रा एल डी पाटील, एम डी जाधव,सचिन कांबळे,जितेंद्र. भिलवडिकर,दिलीप सगरे उपस्थित होते.निलेश कुडाळकर यांनी आभार मानले.विवेक कांबळे,अंकुश चव्हाण,प्रा विष्णू होनमोरे,प्रा तृप्ती थोरात,चंद्रकांत कोळी यांनी संयोजन केले,अजय भालकर यांनी सूत्रसंचालन केले.