राज्य क्रॉस-कंट्री स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याचे वर्चस्व

आमदार विक्रमदादा सावंत म्हणाले, जतचे रणजी क्रीकेट स्पर्धेचे कर्णधार कै. विजयसिंह डफळे (सरकार) यांचा जतच्या क्रीडा क्षेत्रातील वारसा व परंपरा जपण्यासाठी तसेच जत तालुक्यातून विशेषता ग्रामीण भागातून राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक व संघटक घडावेत या साठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

    जत : राजे रामराव महाविद्यालय,जत येथे महाराष्ट्र अॅथलेटिक असोसिएशनच्या मान्यतेने सांगली जिल्हा अॅमॅच्युअर अॅथलेटिक असोसिएशन, सांगली व विक्रम फाऊंडेशन, जत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्य स्तरीय क्रॉस-कंट्री स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याने वर्चस्व राखले आहे. या स्पर्धेचे उदघाटन आमदार विक्रमदादा सावंत व बक्षिस वितरण नामदार कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या शुभ हस्ते झाले.या प्रसंगी स्वामी विवेकानंद संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळूंखे व शार्दुराजे डफळे (सरकार) यांची प्रमुख उपस्थिती होती.

    या राज्यस्तरीय स्पर्धेत वयोगटनिहाय स्पर्धेचे उदघाटन महिला खुलागट-आमदार विक्रमदादा सावंत, १६ वर्षे मुले- उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले,१६ वर्षे मुली- डी.सी. सी. बँकेचे संचालक सरदार पाटील,खुलागट पुरूष सांगली बाजार समितीचे संचालक अभिजित चव्हाण, २० वर्षे मुली जिल्हा क्रीडाधिकारी माणिक वाघमारे, १८ वर्षे मुले-संघटनेचे संस्थापक सदस्य डी. बी. माळी,१८ वर्षे मुली- शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त बापू समलेवाले, २० वर्षे मुले-जतचे तहसिलदार जीवन बनसोडे यांच्या हस्ते खेळाडूंना झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले.

    या राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेस राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य एस्. एस्. पाटील, महाराष्ट्र अॅथलेटिक असो.चे उपाध्यक्ष राजू प्याटी,संजय पाटील,सहसचिव दिनेश भालेराव, प्रांत अधिकारी जोगेंद्र कटारे, गटविकास अधिकारी दिनकर खरात, काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुजय शिंदे, विक्रम फाऊंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम, पंचायत समिती सदस्य दिग्वीजय चव्हाण,नगरसेवक राजू यादव, महादेव कोळी,आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष संजय कांबळे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय बंडगर, माजी सरपंच मारूती पवार, जिल्हा क्रीडा संघटक संजय सावंत,जत युवक काँग्रेसचे अध्यक्ष आकाश बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

    कृषी राज्य मंत्री तथा राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू विश्वजीत कदम बक्षिस वितरण समारंभाच्या वेळी म्हणाले की, या राज्य क्रॉस-कट्री स्पर्धेचे नियोजन आयोजन सांगली जिल्हा संघटनेने व विक्रम फाऊंडेशनने अतिशय देखणे व उत्कृष्ठ केले आहे याचा मला अभिमान वाटतो.तसेच जत तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात लागेल ती मदत खेळाडू, मार्गदर्शक व संघटक यांना भारती विद्यापीठाच्यावतीने केली जाईल. प्रसंगी काही गरीब व होतकरू खेळाडूंना दत्तक घेतले जाईल.

    आमदार विक्रमदादा सावंत म्हणाले, जतचे रणजी क्रीकेट स्पर्धेचे कर्णधार कै. विजयसिंह डफळे (सरकार) यांचा जतच्या क्रीडा क्षेत्रातील वारसा व परंपरा जपण्यासाठी तसेच जत तालुक्यातून विशेषता ग्रामीण भागातून राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक व संघटक घडावेत या साठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विजेते खेळाडूंना प्रमाणपत्र, मेडल, ट्राफी व सर्वसाधारण विजेतेपदासाठी चषक प्रमुख पाहूण्याच्याहस्ते देण्यात आला.

    या बक्षिस वितरण समारंभात जत तालुक्यातील राट्रीय खेळाडू व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त युवराज खटके, मल्लीकार्जुन बिराजदार, परवेज गडीकर, हर्षदा सावंत व सुहास व्हनमाने यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

    कै.राजा स्वामी व कै.प्रा.वसंतराव जाधव या दोन्ही शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संघटकानी सांगली जिल्हा व जत तालुक्यात क्रीडा क्षेत्रात अनेक खेळाडूंना प्रेरणा व प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. त्यांच्याच प्रेरणेतून तयार झालेले आंतरराष्ट्रीय खेळाडू शामराव गावडे, विजयमाला पाटील, मंगल फोंडे, भास्कर भोसले व राष्ट्रीय खेळाडू बाळासाहेब माने, सौ. गंगा बिराजदार, महेश पाटील, गणेश सिहासने, समिर सनदी, अभिजित पाटील, संतोष पाटील, आक्रम मुजावर, अश्विनी दुकानदार, स्वाती व्हनवाडे, ज्ञानेश्वर आवटे, सुरेश मोटे, उत्तम मोटे, नागेश मोटे, बाळासाहेब वाघमोडे, मनोहर मोटे, मोहन ठवरे, शहाजी ठवरे, तात्यासाहेब कांबळे, कपीला खवासे, शारदा, पाटील, लिंगराज सरगर, बापू सरगर, मनिषा चपने, माया शिंदगी यातील बरेच खेळाडू उपस्थित होते.

    राज्य क्रॉस कंट्री स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे. खुलागट पुरुष:- १) प्रल्हाद धनवट ३०.५३ औरंगाबाद, २) आदेश यादव-३०.५८ नाशिक, ३) उपेंद्र बलियान- ३१.४३ नाशिक,

    ४) विवेक मोरे -३२.०९ कोल्हापूर, ५) सिध्दांत पुजारी कोल्हापूर ६) प्रतिक उंबरकर ३२४५ सातारा खुलागट महिला:- १) संजिवनी जाधव- ३६.३२ नाशिक, २) कोमल जगदाळे- ३६.४७ नाशिक, ३) रेश्मा केवटे- ३७.४२ सातारा,

    ४) निकिता राऊत – ३८.२० नागपूर, ५) प्राची गोडबोले- ३९.१३ नागपूर, ६) जन हुलवान- ३९.१८ सातारा २० वर्षाखालील मुले:- १) अंकितकुमार- २६.०१ पुणे, २) इंद्रजित फराकटे-२६.०८ कोल्हापूर, ३) तरण घादुले-२६.०९ अहमदनगर,

    ४) ओंकार पन्हाळकर-२६.३१ कोल्हापूर, ५) अभिषेक देवकते २६.३९ कोल्हापूर, ६) दादा शिंगाडे-२६.५९ सातारा, २० वर्षाखालील मुली:- १) रिंकी पवार २२.१७ नाशिक, २) प्राजका शिंदे – २२.५१ कोल्हापूर, ३) पल्लवी जगदाळे – २३.२४ नाशिक ४) विषाखा साळूंखे-२३.२९ सातारा, ५) भाग्यश्री भंडारी – २३.३५ अहमदनगर, ६) शिवानी कुलकर्णी – २४.१५

    १८ वर्षाखालील मुले:- १) सुजित तिकोडे- १९.४२ कोल्हापूर, २) अदित्य पाटील ९९.४४ कोल्हापूर, ३) गौरव भोसले- २०.०३ पुणे, ४) किशोर कामखाने- ३०.२५ औरंगाबाद, ५) पियुष मसाने २०.२९ आमरावती, ६) सचिन पवार -२०.३७ परभणी

    १८ वर्षाखालील मुली:- १) श्रुष्टी रेडेकर-१४३८ कोल्हापूर २) तन्वी खोरणे वाशिम, ३) गायत्री पाटील- १५.०३ रायगड, ४) प्राची देवकर- १५.०८ सातारा, ५) वैष्णवी ऐवर- १५.३७ वाशिम, ६) पुर्वा शेवाळे – ९५.४३ कोल्हापूर १६ वर्षांखालील मुले:- १) केशव पन्हाळकर – ६.०७ कोल्हापूर, २) मोहित जगताप-६.०८ सातारा, ३) स्वराज जोशी- ६.१७ रत्नागीरी,

    ४) अप्रित मिश्री- ६. २५ रायगड, ५) हर्षद कदम – ६.२९ कोल्हापूर, ६) राजेंद्र इंपाल- ६.३० नाशिक, १६ वर्षाखालील मुले:- १) भव्यश्री महाले ७.०५ नागपूर, २) स्वाती कल्होळे- ७.१३ कोल्हापूर, ३) साक्षी भंडारी- ७.२० अहमदनगर, ४) मानसी यादव – ७. २९ पुणे, ५) वैभवी कुंभार – ७.३९ कोल्हापूर, ६) आदिती पाटील ७.४३ पालघर