इस्लामपुरातील बंड्या कुटे गँगवर ‘मोक्का’

    वाळवा : इस्लामपूर येथील कुख्यात संदीप उर्फ बंड्या कुटे गँगवर मोक्कातंर्गत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उप अधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिली.

    येथील कापूसखेड रस्त्यावरील मोकळया प्लॉटींगच्या जागेत राजेश सुभाष काळे (३५, मुळ रा.बावची, सध्या नेहरुनगर इस्लामपूर) या सेंट्रींग मजूराचा दगडाने ठेचून निघृण खून केल्या प्रकरणातील संदीप शिवाजी कुटे (२२, रा. लोणारगल्ली, इस्लामपूर), ऋतिक दिनकर महापूरे (२१, खांबेमळा,इस्लामपूर), अनिल गणेश राठोड (२६,रा.लोणारगल्ली, इस्लामपूर, मुळ रा.ऐनापूर, (एल.टी) विजापूर) अशी मोक्कातंर्गत कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत. अप्पर पोलीस महासंचालक डॉ.राजेंद्र सिंग यांची अंतिम मंजूरी घेवून मोक्का न्यायालय इस्लामपूर यांच्या न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. इस्लामपूर शहरातील हा ७ वा तर तालुक्यातील हा ८ वा मोक्का आहे, असे पिंगळे यांनी सांगितले.

    कारवाई झालेल्या आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. या तिघा आरोपींविरुध्द मोक्कातंर्गत कारवाई करून त्या गुन्हयाच्या तपासात आरोपी विरुध्द तांत्रिक व परस्थितीजन्य पुरावा मिळाल्याने या गुन्हयात अप्पर पोलीस महासंचालक
    डॉ.राजेंद्र सिंग यांची अंतिम मंजूरी घेवून मोक्का न्यायालय इस्लामपूर यांच्या न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये पोलीस अधिक्षक दिक्षीत गेडाम, अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले यांच्यामार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी कारवाई केली. या गुन्हयाच्या तपासामध्ये हेड कॉन्स्टेबल संदीप सावंत यांनी मदत केली.