बॉयफ्रेंडसाठी आईने केला साडेतीन वर्षाच्या लेकराचा खून, आरोपी महिलेला अटक

सदर आरोपी महिला प्राची हिचे बिळाशी येथील अमरसिंह पाटील याच्याशी अनैतिक संबंध होते. २७ जून २०२१ रोजी प्राची वाजे ही मुलगा मनन सह घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेली. ती अमरसिंह पाटील याच्या मुंबई येथील घरी वास्तव्यास गेली होती. यावेळी अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याने प्राची आणि अमरसिंह यांनी मननचा शारीरिक छळ सुरू केला होता. त्यानंतर दोघांनी मनन याचा खून करून त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावली. या दोघांनी मननवर मुंबईत अंत्यसंस्कार करुन प्रेताची विल्हेवाट लावली होती.

  सांगली : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा आईनेच प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी आष्टा पोलीस पोलिसांनी मुलाची आई आरोपी प्राची वाजे आणि तिचा प्रियकर अमरसिंह पाटील यांना अटक केली आहे. अटकेत असलेला आरोपी अमरसिंह पाटील हा शिराळा पंचायत समितीचा विद्यमान सदस्य आहे.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर आरोपी महिला प्राची हिचे बिळाशी येथील अमरसिंह पाटील याच्याशी अनैतिक संबंध होते. २७ जून २०२१ रोजी प्राची वाजे ही मुलगा मनन सह घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेली. ती अमरसिंह पाटील याच्या मुंबई येथील घरी वास्तव्यास गेली होती.

  मयत मुलगा

  यावेळी अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याने प्राची आणि अमरसिंह यांनी मननचा शारीरिक छळ सुरू केला होता. त्यानंतर दोघांनी मनन याचा खून करून त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावली. या दोघांनी मननवर मुंबईत अंत्यसंस्कार करुन प्रेताची विल्हेवाट लावली होती.

  आरोपी महिला

  मनन हा मुंबई येथे मयत झाला असताना अमरसिंह पाटील आणि प्राची यांनी बिळाशी ग्रामसेवकांकडे प्रतिज्ञापत्र करुन मनन याचा बिळाशी येथे मृत्यू झाल्याचे खोटी माहिती दिली. त्यानंतर वाळवा येथे याबाबतचे निनावी पत्र सुशांत वाजे यांना आल्याने संबंधित घटनेची माहिती त्यांना माहिती झाली.

  मुलाच्या मृत्यूचे निनावी पत्र मिळताच आरोपी महिलेचे पती सुशांत वाजे यांनी आष्टा पोलीस स्थानक गाठले व पत्नी व तिच्या प्रियकराविरोधात तक्रार दिली.

  आरोपी महिलेचा प्रियकर

  दरम्यान, सदर महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून आष्टा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींवर बाल न्याय कायदा 75 अन्वये 302, 201, 366, 498, 177, 34 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, पोलिसांनी संबंधित घटनेची पूर्ण माहिती घेवून संशयित पत्नी प्राची आणि तिचा प्रियकर अमरसिंह पाटील यांना अटक केली आहे.