sangli bus depot

एसटी कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून संपावर आहेत. या संपामुळे प्रवाशांचे (MSRTC Workers Strike) प्रचंड हाल तर होत आहेच. दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांचेही आर्थिक हाल होत आहे.

    सांगली : एसटी महामंडळाचे (MSRTC) राज्य शासनामध्ये विलिनीकरण करून कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार (Seventh Pay Commission) पगार द्यावा, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून संपावर आहेत. या संपामुळे प्रवाशांचे (MSRTC Workers Strike) प्रचंड हाल तर होत आहेच. दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांचेही आर्थिक हाल होत आहे. एकीकडे कर्मचाऱ्यांनी अशा पद्धतीने वागणं बरं नव्हं, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत, तर दुसरीकडे राज्य सरकार आणि एसटी प्रशासनाने सन्मानपूर्वक तोडगा काढून आंदोलन संपवावे तरच एसटी वाचेल. असेही सांगितले जात आहे.

    या परिस्थितीमध्ये मात्र सामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. विशेषत: ग्रामीण भागात ही समस्या अधिक गंभीर आहे. यामुळे यावर तोडगा काढण्याची मागणी होत आहे. एसटी कर्मचारी सामान्य कुटुंबातील असल्यामुळे त्यांना एसटी वाचवायची आहे. प्रवाशांचीही गैरसोय करायची नाही. पण शासन व प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या मागणीचा सहानुभूतीने विचार करून तोडगा काढण्याची गरज आहे. राज्य शासनात विलीनीकरण हा मुद्दा बाजूला ठेवून किमान कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग तरी लागू करण्याची गरज आहे. तरच आंदोलनात तोडगा निघू शकतो.