आटपाडीतील ‘त्या’ १६ लाखाच्या बकरी चोरीचा पोलिसांनी लावला छडा ; तिघांना अटक

आटपाडीतील प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित जनावरांच्या बाजारात दीड कोटी रुपये दर असलेला मोदी बकरा आणि त्याचाच वंश असलेल्या १६ लाखाचा बकरा चर्चेचा विषय ठरला होता.

आटपाडीतील प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित जनावरांच्या बाजारात दीड कोटी रुपये दर असलेला मोदी बकरा आणि त्याचाच वंश असलेल्या १६ लाखाचा बकरा चर्चेचा विषय ठरला होता. याच सोळा लाख रुपये किंमत असलेल्या बकऱ्याची शनिवारी पहाटे एका आलिशान चारचाकी गाडीतून चोरी करण्यात आली होती.बकऱ्याच्या चोरीनंतर त्याच्या मालकाने पोलसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी या तक्रारीची तात्काळ दखल घेत २४ तासांच्या आत शोध लावला. १६ लाखाचा हा बकरा आता मालक सोमनाथ जाधव यांच्याकडे देण्यात आला असून पोलिसांनी चोरी केलेल्या तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

१६ लाखाच्या बकऱ्याचा तात्काळ तपास लावणारे आटपाडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांच्यासह पोलिस नायक अमोल कराळे, रामचंद्र खाडे, नितीन मोरे, प्रमोद रोडे

-पोलिसांच्या कामगिरीचे तालुक्यात कौतुक

१६ लाखांचा बकरा चोरीला गेल्यांनतर तालुक्यात खळबळ उडाली होती. पोलिसांकडे तक्रार आल्यानंतर त्यांनी तात्काळ या बकऱ्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. आटपाडी शहरातील जागोजागी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये बकरी चोरलेल्या आलिशान गाडीचे जाताना चित्रीकरण झाले होते. त्या गाडीचा तपास आणि माहिती घेऊन पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले होते.सुरुवातीला या संशयित आरोपींनी हात वर केले होते मात्र पोलिसांनी त्यांचा हिसका दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली. या तीन संशयित आरोपीनी मध्यरात्री वॅगनार गाडी मध्ये बकरा टाकून कराड येथील डोंगरावर नेहून ठेवला होता. तेथून बकरा पोलिसांनी ताब्यात घेतला. तसेच व्हॅगनार गाडी आणि तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. आटपाडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस नायक अमोल कराळे, रामचंद्र खाडे, नितीन मोरे, प्रमोद रोडे यांनी हा तपास केला .ही चोरी उजेडात आल्यामुळे आनंदित झालेल्या मेंढपाळानी आटपाडी पोलिसांचा गौरव केला असून गुलाल उधळत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत आटपाडी शहरातून बकऱ्याची वाजत गाजत मिरवणूकदेखील काढली.