vishwajeet kadam

कडेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाचे ११ जिंकून काँग्रेसच्या बालेकिल्यास सुरंग लावला आहे. भाजपच्या या यशाने काँग्रेसचे मंत्री विश्वजीत कदम यांना मोठा धक्का मानला जात आहे.

    कडेगाव : सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कडेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली. येथे भारतीय जनता पार्टीने १७ पैकी ११ जागांवर विजय संपादन केला. भाजपाचे माजी जि.प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख ठरले किंगमेकर, विजया नंतर पृथ्वीराज देशमुख, संग्रामसिंह देशमुख यांचे कार्यकर्त्याकडून अभिनंदन व एकच जल्लोष करण्यात आला.
    कडेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाचे ११ जिंकून काँग्रेसच्या बालेकिल्यास सुरंग लावला आहे. भाजपच्या या यशाने काँग्रेसचे मंत्री विश्वजीत कदम यांना मोठा धक्का मानला जात आहे. कडेगाव नागरपंतायटीमध्ये काँग्रेस पक्षास केवळ ५ जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चंचू प्रवेश करून आपले अस्तित्व सिध्द केले.
    धनंजय देशमुख नगराध्यक्ष पदाचे उमेदवार 
    दरम्यान, धनंजय देशमुख हे भाजपाचा नगराध्यक्ष पदाचा चेहरा असेल. सांगली जिल्हा भाजपाचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या करीष्माने कडेगाव नगरपंचायतीवर विजय मिळवला. भविष्यातील कडेगाव पलुस मतदार संघातील ही लिटमस स्टेस्ट झाली.