राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्यास पुरस्कार जाहीर

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्यास पुणे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने 'कै.किसन महादेव उर्फ आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार' जाहीर झाला. रोख रुपये १ लाख, मानचिन्ह प्रशस्तीपत्रक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

    इस्लामपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्यास पुणे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने ‘कै.किसन महादेव उर्फ आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार’ जाहीर झाला. रोख रुपये १ लाख, मानचिन्ह प्रशस्तीपत्रक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
    तसेच कारखान्याचे चीफ केमिस्ट सुनील सावंत यांना ‘बेस्ट चीफ केमिस्ट’, सुलोचना मोहनराव कदम (कुंडल वाडी) व बळवंत मारुती पाटील (वाटेगाव) यांना ‘ऊस भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार एप्रिल महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या हस्ते दिला जाणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी दिली.
    बेस्ट चीफ केमिस्ट सुनील सावंत यांचा जलसंपदामंत्री जयंत पाटील, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी.आर.पाटील, उपाध्यक्ष विजयराव पाटील यांच्या सत्कार करण्यात आला. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याने जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या कामाचा गौरव करण्यासाठी व्हीएसआयच्या वतीने हा पुरस्कार जाहीर केला आहे.