सागंली जिल्हा परिषद बरखास्त करा :  अतिरिक्त सीईओ चद्रकांत गुड्डेवार

सांगली : जिल्हा परिषदेत बेकायदा ठराव प्रकरणी अतिरिक्त मुख्य कार्यकारी चंद्रकांत गुडेवार यांनी काही जिल्हा परिषदेच्या सदस्यांविरोधात शीतयुद्ध पुकारले आहे . गुडेवार यांनी सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जिल्हा परिषद विसर्जीत करा , अशी शिफारस करावी असा प्रस्ताव दिला आहे .

तसेच सदस्यांच्या शिफारशीने काम वाटप व्हावे , असा ठराव जिल्हा परिषदेच्या ( दि . २६ ) च्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर झाला आहे . हा ठराव राज्यघटनेच्या कलम १४ चे उल्लंघन करणारा आहे . कंत्राटदारासोबत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हितसंबंध निर्माण करणे हे कारण सदस्य अपात्रेतसाठी पुरेसे आहे . सांगली जिल्हा परिषद ही कायद्याने दिलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम नाही . त्यामुळे जिल्हा परिषद , पंचायत समिती अधिनियमातील कलम २६० प्रमाणे जिल्हा परिषद विसर्जित करण्यासाठी शासनाला ( ग्रामविकास विभाग ) शिफारस करावी , असा प्रस्ताव अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे ( दि . २१ ) रोजी दिला आहे .

चद्रकांत गुडेवार यांनी ही बाब गुरुवारी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याही कानावर घातली आहे . जिल्हा परिषदेत गुडेवार विरुद्ध सदस्य हे शीतयुद्ध जोरात भडकले आहे . जिल्हा परिषदेचे ६ सदस्य गुडेवार यांच्या रडावर असल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले . त्यांनी तसे संकेत दिले होते . गुडेवार यांनी आता पदाधिकाऱ्यांसह सर्व ५९ सदस्यांना अपात्र करण्याच्या हालचाली आरंभल्या आहेत . जिल्हा परिषद विसर्जित करावी असा प्रस्ताव तयार केला आहे . मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी हे या प्रस्तावावरून शासनाला शिफारस करणार का याकडे लक्ष लागले आहे .